SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…’अशा’ प्रकारे बँक खात्यातून तुमचे पैसे गेल्यास, बँक जबाबदार राहणार नाही! वाचा सविस्तर..

गुजरातच्या अमरेली ग्राहक कोर्टाने एका केसमध्ये आदेश दिला आहे की, समजा बँक खात्यातून वापरकर्त्याने पैसे न काढताच कट झाला म्हणजेच फ्रॉड झाला तर त्यासाठी बँक दोषी नसेल. कारण वापरकर्त्याकडून होत असलेल्या चुकांसाठी त्याच्या नुकसानीच्या भरपाईसाठी बँक जबाबदार असणार नाही.

अमरेलीमध्ये ग्राहक विवाद निवारण आयोगाने एटीएमद्वारे एका फसवणूक झालेल्या पीडितेला न्याय देताना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे.

Advertisement

झालं असं की..

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेसोबत तब्बल 41,500 रुपयांची फसवणूक झाली. यावर कोर्टाने न्याय देताना म्हटलं की, “फसवणूक त्या व्यक्तीच्या स्वत:च्या चुकीमुळे झाली आहे. त्यामुळे बँकेची यात कोणतीही जबाबदारी नाही”, असं मत कोर्टाने नोंदवलं.

Advertisement

संपूर्ण प्रकरण असं..

2 एप्रिल 2018 रोजी सेवानिवृत्त शिक्षक कुर्जी जाविया यांना स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्यवस्थापक असल्याचं सांगत एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने जाविया यांच्या एटीएम कार्ड्सचे डिटेल्स मागितले. जाविया यांनीही त्या व्यक्तीला ATM डिटेल्स दिले.

Advertisement

मग काय, जाविया यांच्या बँक खात्यात दुसऱ्याच दिवशी 39,358 रुपये पेन्शन आली व त्याचवेळी अचानक त्यांच्या खात्यातून 41,500 रुपये नाहीसे झाले.

जावीया यांनी बँकेत फोन केला, पण बँकेतून कोणत्याही प्रकारची मदत, प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यानंतर काही दिवसांत कळतं की, त्या सर्व पैशांचा वापर ऑनलाईन शॉपिंगसाठी केला होता.

Advertisement

पैशांच्या झालेल्या नुकसानाबाबत जाविया यांनी आपलं म्हणणं मांडताना म्हटलं की, “जर बँकेने त्वरित या प्रकरणावर कारवाई केली असती, तर आपलं झालेलं नुकसान रोखता आलं असतं.” यानंतर मदत न मिळाल्यामुळे त्यांनी एसबीआय विरोधात लगेच याचिका दाखल केली.

बँक दोषी का नाही, असं कोर्ट का म्हटलं ?

Advertisement

कोर्टाने सांगितलं की, बँक आपल्या ग्राहकांना आपले एटीएम कार्ड डिटेल्स किंवा बँक खात्यासंबंधित कोणताही तपशिल कोणत्याही व्यक्तीशी शेअर न करण्याचा वेळोवेळी इशारा देते. हा इशारा फोन, मेसेज याद्वारे बँक वारंवार देत असते. सावधान राहून आपणच याबाबत काळजी घ्यावी अस बँक सांगते. याबाबतचे मेसेजही बँकेकडून ग्राहकांना पाठवले जातात. बँकेतला कोणताही कर्मचारी, ग्राहकाकडे कधीही एटीएम कार्ड डिटेल्स मागत नाही. परंतु याचिकाकर्त्या जाविया यांनी नेमकं तीच चूक केली. बेजबाबदारपणामुळे, दुर्लक्षामुळेच हा फ्रॉड घडला असून यात बँकेची चूक नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांना या प्रकरणात कोणतीही भरपाई देण्यात नकार देण्यात आला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement