SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी हि महत्वाची 9 कामे नक्की पूर्ण करा

31 मार्च 2021 रोजी चालू आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे आर्थिक कामांचे निगडित ज्या कुठल्या अडचणी असतील त्या निवारण करण्याचे आणि आर्थिक कामे पूर्ण करण्याचे काहीच दिवस आता शिल्लक आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत, 31 मार्च च्या आधी महत्त्वाची कामे कोणती जी तुम्हाला पूर्ण करणे गरजेचे आहे.

• डबल टॅक्सेशन पासून वाचण्यासाठी डिक्लेरेशन देणे

Advertisement

द सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने या आर्थिक वर्षात मिळवलेल्या उत्पन्नावर दुप्पट कर लागू असलेल्या परदेशी नागरिकांना आणि अनिवासी व्यक्तींना भारतात कोरोनामुळे नाईलाजाने राहिल्याने संबंधित माहिती 31 मार्च 2021 ची यादी दाखल करण्याचे सांगितले आहे. संबंधित व्यक्तींना असे आदेश देण्यात आले आहेत की, डी टी ए ए कडून मिळालेल्या सवलतीचा लाभ घेऊन सुद्धा जर त्यांना डबल टॅक्स भरावा लागला असेल तर, ते फॉर्म एन आर मध्ये याची माहिती सादर करून सवलत किंवा विशेष सवलत मिळवण्यात बद्दल मार्ग मिळवू शकतात.

• आधार-पॅन लिंक करणे

Advertisement

कोरोनाव्हायरस प्रादुर्भावामुळे सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घेण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली होती. हेच सर्वात महत्त्वाचे काम असल्याने 31 मार्च पर्यंत तुम्हाला दोन्ही कार्ड लिंक करून घ्यावे लागणार आहेत. असे झाले नाही तर, तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते.

•  एल टी सी कॅश व्हाउचर स्कीमअंतर्गत बिल जमा करणे

Advertisement

एलटीसी कॅश बाउजर योजनेअंतर्गत कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी जीएसटी रक्कम आणि विक्रेत्यांचा जीएसटी क्रमांक असलेली योग्य बिले आपल्याला एम्प्लॉयर ला 31 मार्च च्या आधी सादर करावी लागणार आहेत. या स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना बारा टक्के किंवा त्याहून अधिक जीएसटी असणाऱ्या वस्तू आणि सेवांवर एल टी ए फेयर म्हणून समजल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा तिप्पट खर्च करावा लागतो.

• सुधारित किंवा उशिरा आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख

Advertisement

या आर्थिक वर्षासाठी सुधारित केव्हा उशीरा इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. उशिरा जर इन्कम टॅक्स रिटर्न स्वतंत्रपणे दाखल केले तर दहा हजार रुपये फी भरावी लागेल. पाच लाखांपर्यंत त्पन्न असणार्‍या छोट्या करदात्यांना लेट फाइलिंग ही एक हजार रुपये असणार आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वी कर भरणे अनिवार्य आहे.

• टॅक्स सेव्हिंग एक्झरसाइज पूर्ण करणे

Advertisement

जुन्या कर प्रणाली चा पर्याय निवडला असेल तर 31 मार्च 2021 पर्यंत आपली कर बचत गुंतवणूक किंवा खर्च पूर्ण केले असल्याची निश्चिती करून घ्या. ही तारीख निघून गेली तर, आपण आर्थिक वर्षासाठी आपले आयकर उत्तरदायित्व कमी करण्याची संधी गमावून बसाल.

• विवाद से विश्वास योजनेसाठी डिक्लेरेशन जमा करणे

Advertisement

‘विवाद से विश्वास’ या योजनेअंतर्गत वादविवादाचे निराकरण करण्याची अंतिम मुदत सुद्धा 31 मार्च पर्यंत वाढवली आहे. डिक्लेरेशन दाखल केल्यानंतर पेमेंट ची रक्कम ॲडिशनल अमाऊंट शिवाय 30 एप्रिल 2021 रोजी किंवा त्या पूर्वी भरली जाऊ शकते.

• स्पेशल फेस्टिवल ऍडव्हान्स स्कीमचा लाभ घेणे

Advertisement

सरकारी कर्मचारी 31 मार्च रोजी किंमत यापूर्वी दहा हजार रुपयांच्या बिनव्याजी विषय आगाऊ रक्कम घेऊ शकतात. एलटीसी कॅश वाउचर स्कीम सरकारने ऑक्टोबर 2020 मध्ये या खास योजनेची घोषणा केली, आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आगाऊ रक्कम जास्तीत जास्त दहा अपत्यांमध्ये वसूल केली जाईल असे देखील सांगितले. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्याची अंतिम तारीख देखील 31 मार्च आहे.

• पीएम आवास योजने अंतर्गत 31 मार्च पर्यंत रजिस्ट्रेशन करणे

Advertisement

पीएम आवास योजनेअंतर्गत क्रेडिट सबसिडीचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत देखील 31 मार्च आहे. सहा लाख ते अठरा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मध्यम उत्पन्नाच्या गटांना गृहकर्जावर अटी शर्ती लागू होऊन ही योजना क्रेडिट सबसिडी देते. गृहकर्जावरील कमी व्याजदरामुळे या योजनेअंतर्गत कर्जदारांवरील हप्त्याचा भार कमी करण्यास मदत होते.

• इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम

Advertisement

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत सरकारकडून इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम ची घोषणा 13 मे रोजी करण्यात आली होती. या योजनेत व्यवसायाच्या उद्देशाने जे लोक कर्ज घेऊ इच्छितात त्या व्यक्तींसह विविध संस्थांना पूर्णपणे हमी दिलेली आणि कोलॅटरल फ्री कर्ज दिली गेली आहेत. या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख देखील 31 मार्च आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement