इयत्ता 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. मात्र यामध्ये काही प्रश्न एकापेक्षा जास्त वेळा प्रसिद्ध करण्यात आलेत, तर वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबतही प्रश्न देण्यात आले आहेत. यावरून पालक आणि विद्यार्थी नाराज असून सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिल्या टप्प्यात बारावीच्या 7 आणि दहावीच्या 6 विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. पुढील काही दिवसांत सर्वच विषयांचे प्रश्नसंच मिळणार आहेत.
लॉकडाउनमुळे शाळा वर्षांपासून बंद आहेत, यामुळे शाळा तर बुडल्याच पण विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सरावही पुरेसा झालेला नाही. यातच कोरोनाचा धोका वाढत चालला आहे म्हणून परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात की ऑनलाईन याबाबत चर्चा सुरू आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर पालक, शिक्षक यांनी केलेल्या मागणीनुसार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्नसंच उपलब्ध करून देणार, असल्याचे सांगितले होते. यानुसार हे संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रश्नपेढ्या ऑनलाईन डाऊनलोड करून परीक्षेचा सराव करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे लागेल 👉 https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi
सध्या या दिलेल्या संचांमध्ये काही चुका आढळल्या आहेत. हे काही पालक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे आता पुढे येणारे प्रश्नसंच योग्य पद्धतीने तपासून अपलोड करावेत, अशी जोरदार मागणी विद्यार्थी व पालक करत आहेत. यंदा दहावी व बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाबाबत जे काही प्रश्न होते ते यामध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रश्नसंच अभ्यासपूर्ण नसल्याची टीका होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit