SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

असं का होते? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण का होते?

कोरोना लस घेतल्यानंतर देखील कोरोना होण्याचे प्रमाण जास्त असल्याची प्रकरणे सध्या समोर येत आहेत. मग दोन्ही दोस्त घेऊनही कोरोना कसा झाला अशी शंका आता सर्वसामान्य माणसांमध्ये आहे. जर असे असेल तर मग लस घेणे गरजेचे आहे का? आणि विश्वास कसा ठेवणार? कोरोना लसीकरणानंतर सुद्धा लोकांना का झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

लसनिर्मितीचा कालावधी:
लस निर्माण करण्यासाठी जो कालावधी लागतो तो इतर लसींच्या बाबतीत आठ ते दहा वर्षांचा असू शकतो. आत्तापर्यंत इतिहासात पाहिल्यानंतर लक्षात येते की, कोणतीही लस निर्माण करण्यासाठी किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी लागलेला वेळ हा आठ ते दहा वर्षांचा होता. मात्र कोरोना या महामारीच्या काळामध्ये आपल्याकडे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आठ ते दहा महिन्यातच दोन लसी विकसित करण्यात आल्या. त्यामध्ये सुधारणा किंवा त्याची परिणामकारकता यामध्ये भिन्नता किंवा कमी-अधिकपणा असू शकतो. या कारणामुळे देखील काळजी घेण्यात मागेपुढे राहिल्यानंतर कोरोना चे निदान दोन्ही डोस घेतल्यानंतर होऊ शकते. लस पूर्णपणे सुरक्षितच आहे. मात्र, त्यानंतर निर्धास्त न फिरता स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, त्याची परिणामकारकता आणि त्यासाठी लागणारा कालावधी फार आपल्याला मिळालेला नाही.

Advertisement

वेगळे व्हायरस:
दुसरा डोस घेतल्यानंतरही कोविड चाचणी पॉझिटीव्ह येण्याचे भिन्न प्रकारचे व्हायरस हेही महत्वाचे कारण असू शकते. व्हायरस युनायटेड किंग्डम आणि दक्षिण आफ्रिका या देशातील असल्यास त्या व्हायरसला आपल्याकडील लस कितपत सुरक्षा देते यावर थोडी फार शंका आहे. आपण अशा कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आणि त्या व्यक्तीला नेमका कोणता व्हायरस होता झोप त्याच्याकर्वे आपल्याकडे आला हेही तपासणे गरजेचे आहे, आणि हे जवळपास निश्चित असल्यामुळे देखील कोरोना होण्याचा धोका वाढतो.

लसीच्या डोसमधील अंतर:
वैज्ञानिकदृष्ट्या असे स्पष्ट झाले आहे की, लसीच्या दोन डोस मधील अंतर तीन महिन्यांचे असते, तो कालावधी सर्वात प्रभावी व चांगली परिणामकारकता दाखवणारा असतो. परंतू, सध्या आपल्याकडे दोन डोसमधील अंतर 4 आठवड्याचे आहे. त्यामुळेही डोसनंतर कोरोना होण्याचे प्रमाण असू शकते.

Advertisement

हलगर्जीपणा:
लस घेतल्यानंतर लोक हलगर्जीपणा करायला सुरुवात करतात. निर्धास्त होतात, मास्क घालण्यात थोडासा हलगर्जीपणा होतो. काळजी घेण्यात हलगर्जी हेही महत्वाचे कारण वाटते. म्हणूनच लस घेतल्यानंतरही आपण स्वतःचे कोविड विषाणुपासून संरक्षण करायला हवे. मात्र, लसीकरण साखळी तोडण्यासाठी आवश्यक असते.

Advertisement