SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

परीक्षा देणं झालं आणखी सोपं ! 10वी अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी सरकारनेच दिले ‘महत्वाचे प्रश्न’..

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा सतत पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले व काल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत.

10वी, 12वी परीक्षा कधी ?-

Advertisement

▪️ बारावीची लेखी परीक्षा – 23 एप्रिल ते 21 मे
▪️ दहावीची लेखी परीक्षा – 29 एप्रिल ते 20 मे

▪️ बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा – 5 एप्रिल ते 22 एप्रिल
▪️ दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा – 12 एप्रिल ते 28 एप्रिल

Advertisement

या वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी चांगलीच सुरू झाली आहे. जवजवळ 1 वर्षही होऊन गेले, तशा शाळाही बंद होत्या. कोरोनामुळे शाळाच भरल्या नाहीत त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करुन दिले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

प्रश्नसंच ‘असे’ डाऊनलोड करा-

Advertisement

राज्य शिक्षण मंडळाकडून विषयानुसार प्रश्चसंच पुरविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना हा प्रश्नसंच वेबसाईटवरून डाऊनलोड करावा लागेल व त्याचा आपल्या अभ्यासासाठी उपयोग करावा, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे.

10वी व 12वी परिक्षेसाठी प्रश्नसंच डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉
https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi

Advertisement

दहावी- बारावीच्या परीक्षा घेण्याच्या वेळेस परीक्षेत कोरोनामुळे यंदा सुरक्षित अंतर ठेवून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे व इतर नियम पाळले आवश्यक असणार आहे. शाळा महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेत कसोटी लागणार आहे, तर बोर्डाची नियमित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement