SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

अँटीलिया स्फोटकं प्रकरण :

▪️ CCTV फुटेजच्या तपासात समोर आले आहे की, ही स्कॉर्पियो 18 ते 24 फेब्रुवारीच्या काळात अनेक वेळा सचिन वाझेंच्या सोसायटीमध्ये दिसली होती. हिरेन यांनी आपल्या जबाबात सांगितले होते की, 17 फेब्रुवारीला मुलुंड-ऐरोली रोडवरुन त्यांची स्कॉर्पियो गायब झाली होती. फॉरेंसिक रिपोर्टवरुनही सिद्ध होते की, कारमध्ये कोणतीही फोर्स एंट्री झालेली नाही. गाडी चावीने उघडण्यात आली होती.

Advertisement

▪️ सचिन ​​​​​​​वाझे सस्पेंड होताच पवार-ठाकरे यांच्यात चर्चा, निवडक वरिष्ठ मंत्र्यांसोबत पवारांची आणखी एक बैठक, अनिल देशमुखांशिवाय दुसरी बैठक; गृहमंत्री बदलणार नाही : जयंत पाटील

सणासुदीच्या हंगामात सोने 11000 रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली

Advertisement

▪️ विक्रमी पातळीवरून सोन्याच्या किंमती आतापर्यंत 11000 रुपयांनी घसरल्या आहेत. त्याचबरोबर चांदीही सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याची किंमत 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.

▪️ ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव 56,200 हजारांच्या विक्रमी पातळीवर होता. जर आपण फक्त या वर्षाबद्दल बोललो तर सोन्यात जवळपास 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Advertisement

पुण्यात दुर्घटना: 25 दुकाने जळून खाक

▪️ छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे भीषण आग, आगीत 25 दुकाने जळून खाक सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

Advertisement

▪️ छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठेला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती, दुर्घटनेत बाजारपेठेतील अंदाजे 25 दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान, पुणे कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 8 वाहनांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.

कोरोना आणि आकडेवारी :

Advertisement

▪️ गेल्या 15 दिवसांमध्ये जवळपास 3 लाख नवीन रुग्ण आढळले, 1700 जणांनी गमावला जीव, उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 54 हजारांपेक्षा जास्त वाढ, देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 14 लाख 9 हजार 595 लोक या महामारीच्या विळख्यात.

▪️ ताजी आकडेवारी (आज 11:00 AM) – भारतात 2,20,433 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,10,25,801 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,58,894 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

Zomato डिलीव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर प्रकरणात नवं वळण, ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR दाखल

▪️ डिलिव्हरी बॉय कामराजने आता त्याच्यावर आरोप करणाऱ्या मॉडेल आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर हितेशा चंद्रानी हिच्यावरच उलट आरोप केलेत. तो म्हणाला की, “हितेशानेच मला शिव्या दिल्या आणि चपलेने मारलं” असं तो म्हणाला. शिवाय त्याने स्वतःवरील सर्व आरोप नाकारले.

Advertisement

▪️ कामराजच्या तक्रारीनंतर बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्थानकात हितेशाविरोधात आयपीसी कलम 355 (हल्ला), 504 (अपमान) आणि 506 ( धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement