SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना 28 हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क मागे देणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येतो.

या योजनेतून 28 हजार 800 रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री.नवाब मलिक यांनी केले आहे.

Advertisement

मंत्री नवाब मलिक म्हणाले :

अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 100 टक्के तर अडीच लाख ते 8 लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 80 टक्के रकमेच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती केली जाते.

Advertisement

या विद्यार्थ्यांना भराव्या लागलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण शुल्काइतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कमेची विद्यार्थ्यांना प्रतिपुर्ती केली जाते. त्यामुळे या योजनेतून विविध अभ्यासक्रमानुसार 19 हजार 200 ते 28 हजार 900 रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळते.

या योजनेतून लाभासाठी विद्यार्थ्यांना 10 मार्च 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा एक संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे

Advertisement

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अधिकृत वेबसाईट – https://mahadbtmahait.gov.in/

दरम्यान, याचा मोठ्या प्रमाणात फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement