देशात मागील काही वर्षांपासून नोटांबद्दल झालेले बदल आणि बदली झालेल्या नोटा यामध्येच खूप काही चर्चा कानावर नक्कीच आल्या असतील. आता यात केंद्र सरकारने भर घातली आहे.
कारण मागील दोन वर्षांत 2 हजार रुपयांच्या नोटेची छपाई करण्यात आली नसल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. नोट छापली नसल्याने याचा तुटवडाही जाणवत आहे, असं सांगितलं जात आहे.
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की..
सरकारने बाजारात नवीन नोटा आणल्या अर्थात 30 मार्च 2018 मध्ये 2000 रुपयांच्या 336.2 कोटी नोटांचे वितरण झाले होते. तर याउलट सांगायचं झालं तर याच वर्षात 26 फेब्रुवारी 2021 मध्ये ही संख्या घटून चक्क 249.9 कोटी झाली.
ते म्हणाले की, कोणत्याही मूल्याच्या बँकेच्या नोटांच्या छपाईबाबत सरकार जो काही निर्णय घेते तो निर्णय जनतेच्या देवाण-घेवाणीची मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयच्या सल्ल्यानुसारच घेते. म्हणून या निर्णयानुसार 2019-20 आणि 2020-21 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईची ऑर्डर दिलेली नाही.
आरबीआयने काय स्पष्टीकरण दिलं ?
आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये सांगण्यात आले होते की आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये (एप्रिल 2016 ते मार्च 2017 पर्यंत) 354.2991 कोटी नोटांची छपाई केली होती. परंतु, 2017-18 मध्ये केवळ 11.1507 कोटी नोटांची छपाई करण्यात आली. 2018-19 मध्ये 4.669 कोटी नोटा छापण्यात आले. एप्रिल 2019 नंतर छपाईची ऑर्डर नसल्याने एकही नोट छापण्यात आलेली नाही.
देशात काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्या आणि त्यानंतर सरकारने 500 रुपयांच्या नव्या नोटा आणि सोबतच 2 हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या. 2000 रुपयांच्या नोटांविना सरकारने सध्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या आहेत. (Demonstration of 2000 Rupees Note )