SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ सोमवार, 15 मार्च 2021

मेष :- व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल. योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. प्रवासावर खर्च होईल. बौद्धिक कौशल्य पणाला लागेल.

Advertisement

वृषभ :- व्यवहार सजगतेने करावा. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कृतीत प्रामाणिकपणा ठेवावा. मानसिक स्थिरता बाळगावी.

मिथुन :- उष्णतेच्या आजारांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका. सुप्त चळवळेपणा कामाला लावा.

Advertisement

कर्क :- कामाची घाई करू नका. अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल. मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा. धार्मिक सहलीचे नियोजन कराल.

सिंह :- खेळाडूंना चांगली संधि मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्णत्त्वाला जातील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. आळस झटकून कामाला लागावे. विरोधक माघार घेतील.

Advertisement

कन्या :- घरातील वातावरण शांत ठेवावे. स्थावरच्या कामात लक्ष घाला. व्यावसायिक संघर्ष लक्षात घ्यावा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

तूळ :- वैवाहिक सौख्यात रमाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. यश डोक्यात जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल.

Advertisement

वृश्चिक :- संमिश्र परिस्थिती लक्षात घ्यावी. सरकारी मदत मिळू शकेल. प्रलोभनापासून दूर राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात.

धनू :- घरगुती खर्चावर लक्ष ठेवा. बाह्यरुपावर भुलू नका. मैत्रीपूर्ण प्रेम वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

Advertisement

मकर :- वडीलधार्‍यांचा योग्य पाहुणचार करावा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत.

कुंभ :- कामाचा व्याप लक्षात घ्यावा. कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल. कागदपत्रे जपून ठेवावीत. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.

Advertisement

मीन :- व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. धार्मिक कामातील गोडी वाढेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ _*ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement