SpreadIt News | Digital Newspaper

‘या’ 8 बँकांचे जुने चेकबुक, पासबुक 31 मार्चपर्यंतच कामी येणार, वाचा नेमकं भानगड काय..?

0

आपण बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही वारंवार बँकेत काम असेल, तर तुमचं चेकबुक, पासबूकची पाने भरत राहतात. तर ऐका
1 एप्रिल 2021 पासून देशातील 8 बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुक आणि IFSC कोड अवैध होणार आहेत. म्हणजेच त्याचा वापर करण्याची मुदत संपणार आहे. त्यानुसार 1 एप्रिलपासून तुमचा जुना चेकबुक कोणत्याही कामाचा राहणार नाही.

तुम्ही फक्त एवढंच करायचं..

Advertisement

ज्या बँकेत तुमचं खातं आहे, अशा बँकांकडून चेकद्वारे पेमेंट बंद होईल. यामुळे जर तुमचंही बँक खातं या सार्वजनिक बँकांमध्ये आहे, तर ताबडतोब आपलं चेकबुक तुम्ही बदलून घ्या. या 8 बँकांचे नुकतेच दुसऱ्या बँकांमध्ये विलीनीकरण झाले आहे.

बँकांच्या विलीनीकरणामुळे आपला अकाऊंट नंबर, आयएफएससी व एमआयसीआर कोडमध्ये बदल होणार आहे. यामुळे बँक 1 एप्रिलपासून जुने चेक स्वीकारणार नाही. म्हणून तुम्हीही जर तुमचं बँकेत खातं असेल तर त्वरित या आपल्या बँक शाखेत जाऊन नवं चेकबुक घेण्यासाठी अर्ज देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Advertisement

कोणत्या बँकांचे झाले विलिनीकरण ?

▪️ देना बँक आणि विजया बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण

Advertisement

▪️ ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण

▪️ सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलीनीकरण

Advertisement

▪️ आंध्रा बँक व कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण

▪️ इलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलीनीकरण झाले आहे.

Advertisement

याप्रकारे केंद्र सरकारने अशा अनेक बँकांचे विलीनीकरण केले आहे. एनपीएच्या बोजामुळे केंद्राने बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला. विलीनीकरणानंतर या बँकांच्या चेकबुक, पासबुक, आयएफएससी कोड या गोष्टींमध्ये बदल होणं निश्चितच आहे.

असं म्हणता येईल की, सिंडिकेट आणि कॅनरा बँकेच्या ग्राहकांना जरासा दिलासा मिळाला आहे, कारण मिळालेल्या माहितीनुसार, सिंडिकेट बँकेत सध्या अस्तित्वात असलेले चेक 30 जून 2021 पर्यंत मान्य असणार आहे. त्यानंतर नवे चेकबुक घ्यावे लागेल.

Advertisement

‘या’ बँकांचे जुने चेकबुक 1 एप्रिलपासून बाद होणार –

▪️देना बँक
▪️विजया बँक
▪️ ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
▪️ युनायटेड बँक ऑफ इंडिया
▪️ आंध्रा बँक
▪️ कॉर्पोरेशन बँक आणि इलाहाबाद बँक

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement