SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📣 सरकारची मोठी घोषणा! आता फक्त ‘इतक्या’ दिवसांत ऑल इंडिया परमिट मिळणार

💁🏻‍♂️ केंद्र सरकाराने टूरिजमला प्रोत्साहन देण्यासाठी ऑल इंडिया टूरिस्ट परमिट ऑपरेटर्सना ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर 30 दिवसांमध्ये परमिट मिळेल अशी माहिती दिली आहे. हा नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे.

🙌 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत कोणताही पर्यटक वाहन ऑपरेटर ऑनलाईनद्वारे ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन/ परमिटसाठी अर्ज करू शकतो.

Advertisement

🧐 नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू – हा नियम संबंधित कागदपत्र जमा केल्यानंतर आणि फीस भरल्यानंतर जारी केला जाईल. यासाठीची कागदपत्र जमा करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा नियम ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन अँड परमिट रुल्स 2021 रुपात ओळखला जाईल.

✔️ 3 वर्षासाठी दिलं जाणार परमिट – परिवहन मंत्रालयानुसार, या स्किममध्ये ऑपरेटरला 3 महिन्याचं परमिट मिळेल. अधिकाधिक 3 वर्षांपर्यंत परमिट दिलं जाऊ शकेल. गेल्या काही वर्षात देशातील पर्यटनातील वाढीच्या दृष्टीने मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे.

Advertisement

📍 दरम्यान, 1 एप्रिल 2022 पासून सरकारी विभाग 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नुतनीकरण अर्थात रिन्यू करू शकणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा प्रस्ताव आणला आहे. याबाबत अंतिम निर्णय आल्यानंतर ही व्यवस्था अंमलात आणली जाईल. हा नियम सरकारी वाहनं, केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका संस्था आणि स्वायत्त संस्थांना लागू होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement