SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

कोरोना मीटर: आज ‘इतके’ वाढले कोरोनाचे रुग्ण तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात सलग तीन दिवस दहा हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या 8744 एवढी आहे. तर आज 9068 जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

Advertisement

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झालं आहे. दरम्यान मागील 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत 52 हजार 500 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताचा नंबर पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळच्याही मागे

Advertisement

आपण जर ब्रॉडबँड इंटरने स्पीडबद्दल बोलायचे म्हटले तर भारत मालदीव, बांगलादेश, पाकिस्तान आणि SAARC देशांमध्ये सर्वात जलद इंटरनेट स्पीड असलेला देश आहे. परंतु Ookla च्या रिपोर्टनुसार मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे आहे.

जानेवारी 2021 बाबत जाहीर करण्यात आलेल्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सच्या अहवालानुसार, मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे आहे. मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत भारतात सरासरी 12.41Mbps स्पीड मिळत आहे तर अपलोडिंग स्पीड केवळ 4.76Mbps इतकं आहे. या बाबतीत भारत जगात 131 व्या क्रमांकावर आहे.

Advertisement

या दिवशी अक्षयचा ‘सूर्यवंशी’ होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

अक्षयचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अक्षय कुमार ही जोडी बऱ्याच वर्षांनंतर एकत्र झळकणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख समोर आली आहे.

Advertisement

अक्षयने ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा एक टीझर ट्वीटर अकाऊंटवर ट्विट केला. हा टीझर शेअर करत त्याने ‘आम्ही वचन दिल्या प्रमाणे तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये भेटणार आहोत… आता ती वेळ आली आहे. आ रही है पुलिस! सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात ३० एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे म्हटले आहे.

“आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे” देवेंद्र फडणवीसांचं सुचकी वक्तव्य

Advertisement

देशाला हादरवून सोडणारे प्रकरण उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका गाडीत आढळलेली स्फोटकं आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मुंब्रा येथे आढळलेला मृतदेह या प्रकरणांमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपाने आक्रमक होत या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती.

त्यानंतर काल दिवसभराच्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. “आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे” असं फडणवीस म्हणाले आहेत.

Advertisement

मराठमोळ्या आदित्य तरेची शतकी खेळी, मुंबईचा युपीवर 6 विकेट्सने शानदार विजय, चौथ्यांदा विजेतेपदावर कोरलं नाव

आदित्य तरेच्या शतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडाकातील अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने चौथ्यांदा विजेतपद पटकावलं आहे. युपीने मुंबईला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले होते.

Advertisement

हे आव्हान मुंबईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईकडून आदित्य तरेने 118 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. तर कर्णधार पृथ्वी शॉने 73 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने महत्वपूर्ण 42 धावा केल्या.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement