SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ रविवार, 14 मार्च 2021

Advertisement

मेष : वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. हातून एखादे सत्कार्य घडेल. मानभंगाला सामोरे जावे लागेल. मित्रांकडून आपणाला लाभ होईल आणि त्यांच्यावर खर्च करावा लागेल. व्यवसायात भागीदारीमध्ये लाभ मिळेल.

वृषभ : अनाठायी खर्च होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी चालढकल महागात पडेल. मित्र आणि वडीलधार्‍यांशी संपर्क होतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल.

Advertisement

मिथुन : सरकारी नोकरदारांना दिवस चांगला जाईल. पत्नीचा हट्ट पुरवाल. दुचाकी वाहन सावधगिरीने चालवावे. पैशाचे व्यवहार तसेच जमीनजुमला अशा व्यवहारांमध्ये कोणाला जामीन राहू नका.

कर्क : कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. स्वभावातील मानीपणा दाखवाल. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Advertisement

सिंह : मानसिक ताण राहील. रागाचा पारा चढू देवू नका. चोरांपासून सावध राहावे. ओळखीचा फायदा होईल. अयोग्य जागी गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक कार्यात गोडी वाटेल.

कन्या : कौटुंबिक क्लेश टाळण्याचा प्रयत्न करावा. समाधान शोधण्याचा कसोशीने प्रयत्न कराल. वैचारिक दिशा बदलावी. विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल.

Advertisement

तूळ : क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका. कामाचा उरक वाढेल. हातातील अधिकार वापरावेत. परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना अनुकूल योग आहेत. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल.

वृश्चिक : हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेला चांगले बळ मिळेल. कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यांसोबत महत्त्वपूर्ण मुद्दयांवर विचार-विमर्श कराल.

Advertisement

धनु : मन:शांती जपण्याचा प्रयत्न करावा. गृहसौख्याला अधिक प्राधान्य द्यावे. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. नोकरी व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल.

मकर : वायफळ खर्च वाढेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. कोणाच्याही मदती शिवाय कामे पार पाडाल. शस्त्रकियेसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल.

Advertisement

कुंभ : बोलण्यातून अहंपणा दर्शवू नका. नको तिथे खर्च कराल. बढतीची चिन्हे दिसून येतील. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत पर्यटनस्थळी जाण्याची संधी मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल.

मीन : स्वत:चा सत्वगुण राखाल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे. अपेक्षा भंग होण्याची शक्यता. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील.

Advertisement