SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता सरकारी नोकरीसाठी द्यावी लागणार ‘सीईटी’ परीक्षा!

[ 📲 आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://cutt.ly/joinspreadit ]

देशाचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी तरुण वर्गासाठी शनिवारी शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सरकारी नोकर भरतीसाठी सप्टेंबरमध्ये सीईटी आय़ोजित करण्यात येईल असं म्हटलं आहे. ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल, असंही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली.

Advertisement

ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या या सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीने एनआरएची स्थापना करण्यात आली आहे.

देशाचे मनुष्यबळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की..

Advertisement

विशेषतः सरकारी नोकरीसाठी इच्छूक असलेल्या तरुण उमेदवारांसाठी सीईटी ही यंदाच्या वर्षी देशभरात आय़ोजित केली जाणार आहे. या परिक्षेमधून सरकारी नोकर भरतीसाठी उमेदवारांची निवड करता येणार म्हणजेच भरतीसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या परीक्षा सप्टेंबर 2021 च्या दरम्यान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मंत्री जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, डीओपीटीने केलेला अशा प्रकारचा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्तीश: हस्तक्षेप केल्यानंतर व तरुणांबद्दल चिंता व्यक्त केल्यानं शक्य झाला आहे. एनआरए ही एक ही अशी संस्था असेल जी ‘ बी आणि सी’ वर्गातील पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

Advertisement

यामध्ये बदल असा केला गेला की, देशातील प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक परीक्षा केंद्र असणार आहे. याचा परिणाम असा होईल की, लांब पल्ल्याच्या भागात म्हणजेच दूर अंतरावर राहणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्यासाठी चांगलं होईल, असंही जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. याचसोबत या गोष्टीमुळे महिला आणि दिव्यांग उमेदवारांसह आर्थिक परिस्थिती नसलेल्या उमेदवारांनाही यामुळे अधिकच फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भरतीसाठी सांगायचंच म्हटलं तर स्टाफ सिलेक्शन कमीशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल रिक्रूटमेंट बोर्ड्स यांसारख्या केंद्रीय रिक्रूटमेंट एजन्सी त्यांच्या गरजेनुसार भरती करू शकतील. सीईटी फक्त नोकरीसाठी उमेदवारांच्या सुरुवातीच्या स्क्रीनिंगसाठी असणार असंही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

CET Exam for Government Job | Spreadit WhatsApp Link

Advertisement