SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आदत से मजबूर : कितीही समजून सांगा.. आम्ही भारतीय ‘या’ गोष्टी करणे कधीच बंद करणार नाहीत

[ 📲 आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://cutt.ly/joinspreadit ]

आम्हा भारतीयांची एक विशेष सवय आहे. ती म्हणजे की आम्हाला जी कामे करण्यास मनाई केली आहे, ते करायला आम्हाला खूपच आवडतं.

Advertisement

तुम्ही थोडे कंफ्यूज़ झाले असाल ना… हे काही सोप्या शब्दांत समजावून घेवूयात. वास्तविक पाहता आम्हा भारतीयांना कायदेशीर आणि बेकायदेशीर गोष्टींबद्दल माहिती असते, परंतु तरीही आम्ही जाणीवपूर्वक त्याच बेकायदेशीर गोष्टी करतो.

भारतीयांच्या या तेरा चुकांवर आपण एक भारतीय म्हणून नजर टाकू..

Advertisement

एखाद्या सरकारी कार्यालयात लिहिलेले असते की, इथे थुंकू नये. आपण निरीक्षण केल्यास लक्षात येईल की, तिथेच सर्वात जास्त लोक थुंकलेले असतात.

मुलांचा शारीरिक छळ हा गुन्हेगारीच्या प्रकारात येतो, परंतु तरीही शाळा आणि घरी मुलांना अभ्यासातील दोष देऊन मारहाण करून शिक्षा दिली जाते.

Advertisement

आपल्यात भारतीयांमध्ये संयमाचा थोडासा अभाव आहे. हेच कारण आहे की, त्यांना कोणत्याही कामासाठी लाइनमध्ये थांबायचे नसते आणि काही तास लाईनमध्ये उभे असलेल्या लोकांना हे लोक धक्काबुक्की करत पुढे जातात.

शहर कोणतेही असले तरी तेथील रस्त्याच्या कडेला कायमच किरकोळ विक्रीची दुकाने लागलेली दिसून येतात. आता लोकांना आणि वाहनांना ये-जा करण्यासाठी बनविलेल्या रस्त्यावर वस्तू विकणे चुकीचे आहे.

Advertisement

रस्त्याच्या कडेला लघवी करणे :- भारतीय रस्त्यांवर हे दृश्य खूप सामान्य आहे. इतरांना समजवण्याऐवजी जेव्हा मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणारे सुशिक्षित लोकही रस्त्यावर उभे राहून कुठेही लघवी करण्यास सुरुवात करतात तेव्हा आश्चर्य वाटते.

छोटछोट्या सरकारी कामांमध्ये लाच देणे- रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करून थुंकणे.

Advertisement

खरे काय आहे हे लक्षात न घेता व्हायरल झालेले मेसेज, इमेज, व्हिडीओ तसेच पुढे पाठवणे.

सिग्नल तोडणे हा अपराध आहे. तरीही आम्ही भारतीय लोक सिग्नल तोडण्यात सर्वात पुढे आहोत.

Advertisement

भारतीय कायद्यानुसार मुलीकडून हुंड्यासाठी मागणी केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे, परंतु मुलाकडचे लोकही मोकळेपणाने हुंडा मागतात आणि मुलीकडचेही शांततेने इज्जत वाचवण्यासाठी हुंडा देतात.

मुलगी कितीही सुसंस्कृत आणि सभ्य असली तरीही भारतीय लोक तिचा ड्रेस पाहतील आणि मग तिचे त्यांचे चारित्र्य कसे आहे, याचा अंदाज लावतील.

Advertisement

सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिण्यास मनाई आहे. पण आपले ऐकतो कोण भाऊ?

मेट्रोत कचरा टाकू नका, स्वच्छता राखा ऐसे ऐकूनही आपण अनेक वेळा कचरा तसाच मेट्रोत टाकतो.

Advertisement

ऐतिहासिक ठिकाणी जाऊन घाण करणे. तिथे भिंतींवर प्रेयसीचे,आपले नाव अथवा आक्षेपार्ह काहीतरी लिहिणे.

चला तर मग आज पासून शपथ घेऊयात आणि या वाईट सवयी सोडून चांगले नागरिक बनुयात आणि एक चांगला भारत आणि चांगला समाज घडवूयात

Advertisement