SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जर तुम्हाला या 8 सवयी असतील तर, तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळताय! कोणत्या आहेत या सवयी? नक्की वाचा

दिवसभरात माणूस कित्येक गोष्टी करत असतो. काही गोष्टी त्याच्या मनासारख्या घडतात. कधी कधी घडतही नाहीत. दैनंदिन आयुष्यात जगताना आपण अनेक किरकोळ चुका करत असतो. ज्याचा परिणाम आपल्या भविष्यावर होत असतो आणि लक्षात न आल्याने त्याच त्या चुका आपण कायम करत असतो.

१) जर आपल्याला भूक लागलीये असे वाटत नसेल तर स्नॅक घेऊ नका. जर तुम्हाला भूक लागलेली नसतानाही तुम्ही स्नॅक खात असाल तर तुमच्या शरीरासाठी ते चांगले नाही.
२) जर आपण सलूनमध्ये जाऊन न्हाव्याकडून मान मोडून घेत असला आणि बाहेरही तोच प्रयोग केल्यास मानेच्या शिरा आखडून भंयकर त्रास उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे असे अतरंगी प्रयोग टाळा.

Advertisement

३) बरेच टीव्ही पाहणारे त्यांच्या जीवनशैलीकडे लक्ष देण्यास अयशस्वी ठरतात. मग ते वेळेत खात नाहीत किंवा झोपून राहतात त्यांच्या शरीराचे कोलेस्टेरॉल वाढते. जे आरोग्यासाठी योग्य नाही.
४) कधीकधी स्वतःसाठी वेळ शोधणे महत्वाचे असते, परंतु जास्त एकाकीपणामुळे आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. म्हणून जास्त काळ एकटे राहण्याचा विचार करू नका.

५) अनेक लोक काहीही दुखले तरी लगेच पेनकिलर घेतात. त्यामुळे आपल्याला वेदनापासून आराम तर मिळतो, परंतु यामुळे आपणास भविष्यात अल्सर, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव आणि हार्ट अटॅकचा धोका असतो.
६) एका गोष्टीची खूनगाठ बधून घ्य। ती म्हणजे जर तुमचे उत्पन्न 10 रुपये असेल तर त्यामधील 8 रुपये खर्च करा आणि भविष्यासाठी 2 रुपये बचत करा. जर तुम्ही 10 ऐवजी 12 रुपये खर्च केले तर तुम्हाला कायमच अडचण होत राहील.

Advertisement

७) जर तुमचा नाश्ता चुकला असेल तर तुमच्याकडून रात्री जास्त अन्न खाल्ले जाते, जे शरीरात जास्त कॅलरी तयार करते. अशा प्रकारे आपण अधिक ताणतणावात जातात.
८) ज्या लोकांना नखे चावायची सवय असते त्यांना कदाचित हे माहित नसते की त्यामुळे आपल्या शरीरात किती बॅक्टेरिया जातात.

Advertisement