[ 📲 आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://cutt.ly/joinspreadit ]
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक वर्षापासून नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद होत्या. नोव्हेंबरपासून जरी शाळा सुरु झाल्या तरीही 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने 10वी-12वीतील 30 लाख विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) त्यांच्या संकेतस्थळावर सर्वच विषयांचे ऑनलाईन प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण नाही तर परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना किमान सराव करता यावा यासाठी ‘एससीईआरटी’कडून प्रश्नसंच लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता राज्यात कोरोना वाढत असल्याने 10वी-12वी वगळता सर्वच शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.
‘एससीईआरटी’कडून मिळतील प्रश्नसंच-
कोरोना वाढत चाललेला असल्यान ही स्थिती पाहून शाळा सुरु करण्याची जबाबदारी पूर्णतः त्या-त्या स्थानिक प्रशासनावर दिली आहे. तरी 10वी-12वी ची परीक्षा ऑफलाईनच होणार असून यामध्ये विद्यार्थ्यांना व पालकांना ज्या समस्या येत आहेत त्या जाणून घेतल्या जात आहेत.
10वी च्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, समाजशास्त्र व सर्व भाषांचा प्रश्नसंच तर 12वी च्या विद्यार्थ्यांना भाषांसह फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचे प्रश्नसंच होईल तितक्या लवकर ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सर्व विषयांच्या घटकांवर कमीत कमी 15 ते 20 प्रश्न, असा प्रत्येक विषयांचा प्रश्नसंच असणार आहे. ‘एससीईआरटी’चे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतची तयारी अतिशय ताबडतोब सुरु केली आहे.
दहावीसाठी 16 लाख तर बारावीसाठी 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे. आपल्या करिअरला दिशा देण्यासाठी, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या मनातील कोरोनाची भिती दूर होईल, अशा तऱ्हेने नियोजन करण्यासाठी शासनाने सल्लागार समिती नियुक्त केली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेआधी सर्वच विषयांचा सराव करता येईल, त्यांना स्वयंअध्ययनासाठी मदत होईल आणि परीक्षेला जाण्याच्या आधी त्यांचा आत्मविश्वास उंचावेल, याप्रकारे प्रश्नसंच तयार केला जात आहे.