SpreadIt News | Digital Newspaper

इंग्लंडकडून भारतीय संघाचा धुव्वा; कसोटी चा बदला घेतला टी-20 मध्ये!

0

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये दणदणीत पराभव स्वीकारल्यानंतर इंग्लंड संघाने टी-20 मालिकेसाठी आपली कंबर कसली आहे. भारताविरुद्ध झालेल्या पराभवाचा कसोटीतला बदला पहिल्याच टी-20 सामन्यात इंग्लंडने घेतला आहे.

इंग्लंड भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय फलंदाजांनी या सामन्यांमध्ये साफ निराशा करत, सहजच सामना इंग्लंडच्या हातात दिल्याप्रमाणे कामगिरी केली.

Advertisement

श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत मात्र याला अपवाद होते. या दोघांनी जिवाच्या कसोशीने धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला.

निर्धारित 20 ओव्हरच्या सामन्यामध्ये भारताला केवळ 125 धावा करता आल्या, आणि त्यामुळेच भारताचे आव्हान इंग्लंडने अगदी सहज पूर्ण केले.

Advertisement

भारताकडून शिखर धवन आणि के एल राहुल सलामी जोडी म्हणून पुढे आले, मात्र दोघेही स्वस्तात माघारी परतले. पहिल्या चार ओव्हरमध्ये के एल राहुल, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली देखील बाद झालेला होता.

तीन गडी बाद आणि 20 रन्स अशी अवस्था असताना, भारतीय संघाचे पुढे काय होणार? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भारतीय टॉप ऑर्डर बॅट्समन्स ने सर्वांची निराशा केल्याने पुढे कोणाकडून आशा ठेवणार…अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

Advertisement

कसोटी क्रिकेटमध्ये ज्याचा बोलबाला सगळीकडे होता, तो म्हणजे रिषभ पंत! चौथ्या क्रमांकावर आला आणि काही वेळ त्याने चांगली फटकेबाजी केली. तो जेव्हा मैदानावर उतरला तेव्हा तो अतिशय आत्मविश्वासपूर्ण वाटत होता. त्याने तसेच आत्मविश्वासाने पुर्ण असे तगडे शॉट देखील मारले. धावसंख्येचा वेग वाढवण्याचे ध्येय समोर ठेवत रिषभ पंत खेळत असतानाच 21 रन्सवरच आउट झाला.

विराट नंतर, मैदानात उतरला तो श्रेयस अय्यर! विराट कोहली नंतर मैदानात आल्याने, श्रेयस अय्यर ने आपल्यावर जबाबदारी असल्यासारखी इंडियाची पाठराखण केली.

Advertisement

48 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह 67 धावांची खेळी करत, त्याने चांगलीच फटकेबाजी केली. हार्दिक पांड्या ने देखील मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र, त्याला त्यात यश आले नाही. 21 बॉल मध्ये केवळ 19 धावा करत बाद झाला, आणि भारतीय संघाच्या पदरी केवळ 125 धावाच आल्या.

भारतीय संघाने आव्हानच कमी रन्सचे दिले होते. त्यामुळे, इंग्लंडची सुरुवात तर शानदार होणारच होती. जोस बटलर आणि जेसन रॉय ही सलामी जोडी पावर प्ले च्या सहा ओव्हर मध्ये जोरदार फटकेबाजी करण्यात यशस्वी ठरली.

Advertisement

या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी करत, इंग्लंडला टी-20 सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement