SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शनिवार, 13 मार्च 2021

मेष : क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्याल. आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. यात्रेला जाण्याचा विचार करु शकता.

Advertisement

वृषभ : तुमचा मान वाढेल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील. शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. कार्यालयीन कामात तुमची वाहवा होईल. विरोधकांचा चांगल्या प्रकारे सामना कराल.

मिथुन : नवीन मित्र जोडले जातील. काही क्षणिक आनंदाच्या गोष्टी घडतील. ओळखीतून कामे पार पडतील. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Advertisement

कर्क : विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत चांगले मार्क मिळतील. इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पण भाव ठेवा. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

सिंह : जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. नवीन परिचय होतील. संततीसौख्य लाभेल.

Advertisement

कन्या : मानसिक समाधान शोधाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. कामात स्त्रियांची उत्तम साथ लाभेल. संध्याकाळच्या वेळी देव दर्शनाचा लाभ आहे. आजचा दिवस चांगला राहील. आज जास्त खर्च होईल.

तूळ : घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी. जुगाराची आवड पूर्ण कराल. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. जमिनीचे खटले सुटू शकतात. आरोग्यासंबंधी विशेष काळजी घ्या.

Advertisement

वृश्चिक : कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनु : तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. आजचा दिवस उत्कृष्ट असेल. आरोग्यात सुधारणा होतील. धनसंपत्ती मिळेल.

Advertisement

मकर : राजनैतिक क्षेत्रात यश मिळेल. भावाच्या मदतीने खोळंबलेले काम पूर्ण होईल. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. शत्रुपिडा नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कुंभ : वडिलधार्‍यांची उत्तम मदत मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल.

Advertisement

मीन : तुमच्या नेतृत्वाखाली केल्या गेलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. अधिकाऱ्यांच्या संबंधात सुधारणा होईल. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement