SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जाणून घ्या किती होऊ शकते सोने स्वस्त

सोन्याचा दर सुमारे 11 महिन्यांच्या खालच्या स्तरावर आला असून सोन्याने मागील वर्षी ऑगस्टमध्ये 56,200 चा उच्चस्तर गाठला होता, परंतु आता सोने 22 टक्केच्या घसरणीसह 12,400 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झाले आहे. जर या वर्षाबाबत बोलायचे तर 3 महिन्यापेक्षा सुद्धा कमी काळात सोन्याचे दर 6000 रुपयांपेक्षा कमी झाले आहेत.

दिल्ली सराफा बाजारात मागील व्यवहाराच्या सत्रात 24 कॅरेट सोने 44601 रुपये आणि 23 कॅरेट 44422 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदी 110 रुपये प्रति किलोच्या मजबूतीसह 66480 रुपयांवर खुली झाली. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, जागतिक आर्थिक दृष्टिकोणात सुधारणांमुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत.

Advertisement

सोन्याच्या किमतीमध्ये आणखी होऊ शकते घसरण
एक्सपर्टचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किमती कमजोर होणे कदाचित मोठ्या काळासाठी असणार नाही. डॉलरमध्ये कमजोरी, वाढता चलन तुलवड्याचा दबाव आणि आर्थिक विस्ताराचा सोन्याच्या किंमतीवर थेट परिणाम होत आहे.

जाणून घ्या किती होऊ शकते स्वस्त
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता सोन्यात आणखी घसरण होईल. सोने 1500 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकते, ज्यानंतर यामध्ये स्थिरता दिसेल. म्हणजे या हिशेबाने भारतीय रुपयात पहाता सोने 40000 हजारपेक्षा खाली येऊ शकते.

Advertisement

गुंतवणूक करावी किंवा नाही?
आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीचे प्रॉडक्ट डेव्हलमेंट अँड स्ट्रॅटेजी हेड, चिंतन हरिया म्हणतात, गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी आहे. मागच्या वर्षी सुद्धा सोन्याचे रिटर्न सुमारे 25 टक्के होते. जर तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करत असाल तर सोने अजूनही गुंतवणुकीसाठी खुप सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये चांगले रिटर्न मिळू शकते. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोने 40 हजारच्या लेव्हलच्या खाली सुद्धा जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही अजून काही दिवस थांबू शकता.

ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन 🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement