एस.टीने स्वत:च्या आगारातील पेट्रोल पंप लोकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी या संदर्भात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना सांगितले की, राज्यातील एस.टी.चे अनेक पेट्राल पंप मोक्याच्या ठिकाणी आहेत.
आत्तापर्यंत हे पंप केवळ एस.टी.साठीच वापरता येत होते. मात्र दोन महिन्यांपूर्वी इंडियन ऑईल कंपनीशी आम्ही करार केला आहे. त्याप्रमाणे हे पंप चालविण्याची जबाबदारी एस.टी.चीच राहील. पण येथे सर्वसामान्य नागरिकांनाही पेट्रोल- डिझेल विकत मिळू शकेल.
प्रायोगिक तत्त्वावर कोणते पेट्रोल पंप लोकांसाठी सुरू करायचे, हे अजून ठरलेले नाही. येत्या काळात अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेताना पेट्रोल पंप नसलेल्या ठिकाणांचा प्राधान्याने विचार केला जाईल.
त्यामुळे त्या परिसरातील लोकांना इंधन सुलभपणे उपलब्ध होऊ शकेल. एस.टी.चे खासगीकरण करण्याचा शासनाचा विचार नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit