SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘जगदंबा’ तलवारीबाबत मोठा खुलासा… तलवार भारतात आणण्याची मागणी!

छत्रपती श्री शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत तर देशातून परकीय आक्रमणकर्त्यांना परतून लावणारे झंझावाती वादळ म्हणून ओळखले जातात.

इतिहास चाळून पाहिल्यानंतर लक्षात येते की, इंग्रजांची आपल्यावर सत्ता असताना बऱ्याच गोष्टी त्यांनी लुटून नेल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन तलवारी अगदी प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे ‘भवानी तलवार’ आणि दुसरी ‘जगदंबा तलवार’!

Advertisement

जगदंबा तलवारी बाबत एक मोठा खुलासा आता समोर येत आहे. जगदंबा तलवार इंग्लंडच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात असल्याची माहिती समोर आल्याने, भारतातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून शिवप्रेमी संघटनांनी ही तलवार भारतात परत आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सातत्याने प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.

जगदंबा तलवार इंग्लडला गेली कशी?

Advertisement

कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ती शिवरायांच्या वापरातील जगदंबा तलवार असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सिद्ध केले आहे.

आता माहिती समोर आली कशी?
इंग्लंडमधील साउथ केनस्टिंग गॉन म्युझियमचे संचालक सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तिथे असलेल्या भारतीय शस्त्रांची यादी तयार केली आहे. त्यात जगदंबा तलवारीची फोटोसह माहिती आहे.

Advertisement

कशी आहे ही जगदंबा तलवार?

जगदंबा तलवार… जुनी युरोपियन एकपाती, सरळ असून दोन्ही बाजूला दोन खोबणी आहेत. एकामध्ये IHS असं तीनदा कोरलं आहे. तलवारीची मूठ लोखंडी असून त्याला गोलाकार परज आहे. मुठीजवळ सोन्याच्या फुलांचे नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडविले गेले आहेत. तलवार कोल्हापूरच्या छत्रपतींकडून दिली गेली असून, ती मराठ्यांचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आहे, असा उल्लेखही करण्यात आला असल्याने आपण अजून कशाची वाट पाहत आहोत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement