यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात बाळ बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालं होतं. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती.
त्यानंतर बाळ बोठे फरार झाला होता. अखेर 3 महीने फरार राहूनही बोठे याला शोधण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र अखेर रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अखेर अटक केली. हैद्राबाद येथून काल त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला घेऊन पोलिस पथक नगरकडे निघाले आहे.
जरे यांच्या खुनाला तीन महिने होऊन गेले. तरीही बोठेचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी गुरूवारी हा अर्ज मंजूर केला. त्यामुळे आता आरोपी बोठे याला कायदेशीररित्या फरार घोषित करण्यात आले होते.
तपास कसा झाला?
जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केलंय. आरोपींनी हा गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे. या हत्याकांडात नाव आल्यापासून आरोपी बोठे हा पसार झालेला होता. जिल्ह्यासह परजिल्ह्यात आणि राज्यातही शोध घेतल्यानंतर बोठे पोलिसांना आढळून आला नाही