SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

झोमॅटोच्या त्या ‘डिलिव्हरी बॉय’चा महिलेनेच मारहाण केल्याचा दावा; जाणून घ्या बहुचर्चित वादाविषयी!

झोमॅटो च्या डिलिव्हरी बॉय ने मॉडेल हितेशा चंद्राणीच्या नाकावर बुक्का मारल्याने तिच्या नाकाला झालेली दुखापत, आणि एकूणच टोमॅटोच्या डिलिव्हरी सर्व्हिसेस बाबतच्या तक्रारी विषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत चांगलाच व्हायरल झाला आहे.

कामराज असे या डिलिव्हरी बॉय चे नाव आहे. त्याला कर्नाटक पोलिसांनी तात्काळ अटक देखील केली आहे.

Advertisement

कर्नाटक पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या खुलास्यामध्ये त्यांनी असे सांगितले की, हितेशा यांनी जेवण ऑर्डर केले. ते पोहोचवण्यासाठी मला नक्कीच थोडा उशीर झाला. या झालेल्या गैरसोयी बाबत मी त्यांची माफी देखील मागितली.

वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते यामुळे थोडा उशीर झाल्याची कबुली देखील मी त्यांना दिली. मात्र, त्यांनी काहीच नाही ऐकून घेता मला शिवीगाळ करायला सुरुवात केली.

Advertisement

त्यांची ऑर्डर ही कॅश ऑन डिलिव्हरी असल्याने त्यांच्याकडे मी पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांनी ते देण्यासही नकार दिला. कस्टमर केअर सोबत आपली चर्चा सुरू असल्याचे सांगत, त्यांनी माझे पैसे ही दिले नाहीत. मला चपलेने मारहाण करायला सुरुवात केली.

या मारहाणीला विरोध म्हणून, मी जेव्हा स्वरक्षणासाठी हात पुढे केला तेव्हा त्यांचा हात त्यांच्या नाकावर लागला आणि त्यांच्या हातातल्या अंगठीने त्यांच्या नाकाला दुखापत झाली.

Advertisement

तुम्ही त्यांचा व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की माझी हातामुळे नाही तर, त्यांच्या हातातल्या अंगठी मुळे त्यांच्या नाकाला इजा झाली आहे.


डिलिव्हरी बॉय ने दिलेल्या या जबाबामुळे या प्रकरणाविषयी चा गोंधळ थोडा वाढला आहे. अनेकदा कस्टमर्स कडून अशाप्रकारे जेवण पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉय बाबत बऱ्याच तक्रारी असतात. मात्र, मारहाणीचा प्रकार हा प्रथमतः घडला असल्याने याबाबत कोणाचा दावा खरा? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

Advertisement

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ, त्या मॉडेलला झालेली जखम, आणि या डिलिव्हरी बॉय ने केलेला मारहाणीचा आणि स्वसंरक्षणाचा दावा या सगळ्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. तपासाअंती लवकरच खरे काय ते समोर येईल.

Advertisement