राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने पुढे ढकलण्यात आलेली 14 मार्चची पूर्वपरीक्षा आठवडाभरात होईल आणि शुक्रवारी तिची तारीख जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले..
आगामी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा 8 दिवसांच्या आत घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेच्या तारखेची घोषणा 12 मार्च रोजी म्हणजे आज शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
महाराष्ट्रात पुण्यासह वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच महत्त्वाची बातमी असून या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात का होईना, पण आशेचा किरण दिसल्याचं म्हटलं जात आहे.
ते म्हणाले की, “येत्या 14 तारखेला होणारी परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. ‘तारखांचा घोळ संपवा’, अशा सूचना मी स्वतः सचिवांना दिल्या आहे. आज (12 मार्च 2021) ही तारीख जाहीर होईल. तसंच येत्या आठवड्यातच ही परीक्षा होईल,” असं स्पष्ट केलं आहे.
वयोमर्यादा आडवी येणार का ?
MPSC ची पूर्व परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भिती वाटू लागली आहे. ठराविक वयोमर्यादेनंतर त्यांना परीक्षा देताच येणार नाही, याची देखील काळजी विद्यार्थ्यांना आहे. परंतु परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, याचा प्रयत्नही आपण करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि प्रतिक्रिया-
समजा, “जर पुढच्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर त्या परिस्थितीत काय करणार,” असा प्रश्न आता विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. “तर सरकार विद्यार्थ्यांचे करिअरच संपवत आहे,” अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर दिली आहे.
दरम्यान, जोपर्यंत परीक्षा 14 तारखेला घेण्याची घोषणा होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशाराही भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी दिला होता, पण पोलिसांनी गोपीचंद पडळकर व आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कोरोनामुळे वर्षभरात तब्बल 6 वेळा परीक्षा लांबणीवर-
▪️ 5 एप्रिल 2020
▪️ 26 एप्रिल 2020
▪️ 13 सप्टेंबर 2020
▪️ 20 सप्टेंबर 2020
▪️ 11 ऑक्टो. 2020
▪️ 14 मार्च 2021
👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit