SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांनो ! बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र घेतलं नसेल तरीही इंजिनिअर होता येणार..

आपलं भविष्य उज्वल बनविण्यासाठी अनेक जण इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. या निर्णयाचा पुढील शैक्षणिक वर्षात मोठा परिणाम होणार आहे.

निर्णयात काय ?

Advertisement

इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) हे 2 विषय बारावीला आवश्यक नाहीत, असा महत्वाचा निर्णय ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेने घेतला आहे.

इजिंनिअरिंगसाठी प्रवेश घेताना गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय खूपच महत्वाचे समजले जातात. मात्र शैक्षणिक वर्ष 2021-22 यावर्षी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Advertisement

आता या संस्थेने एक यादी जाहीर केली असून ही 14 विषयांची यादी आहे. आता यापैकी कोणत्याही 3 विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय सोडून इतरही विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअर होता यावे म्हणून संस्थेने हा निर्णय घेतला आहे.

2021-22 या शैक्षणिक वर्षापासून कोणत्या 14 विषयांचा समावेश?

Advertisement

▪️ भौतिकशास्त्र
▪️ रसायनशास्त्र
▪️ गणित
▪️कॉम्प्युटर सायन्स
▪️ इलेक्ट्रॉनिक्स
▪️ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
▪️ जीवशास्त्र
▪️ इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस
▪️ बायोटेक्नॉलॉजी
▪️ टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट
▪️ इंजिनिअरिंग ग्राफिक्स
▪️ बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता

आता या निर्णयाच्या परिणामानुसार या निर्णयाचे पडसाद कसे उमटतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ‘गणित हा विषय इजिंनियरिंगला असणाऱ्या सर्व विषयांचा एक पाया आहे. इंजिनियरिंग शिकण्यासाठी प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी गणिताचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे,’ असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. AICTE च्या अभ्यासक्रमानुसार, इंजिनिअरिंगला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचव्या सत्रापर्यंत (Semester) गणित हा विषय आहे. त्यामुळे बारावीलासुद्धा हा विषय हवा, असं तज्ज्ञांचं मत आहे.

Advertisement

AICTE संस्थेचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केलं की, ‘इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक अशा 3 विषयांच्या यादीचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांसाठी 3 वेगळे आवश्यक विषय असतील, असे त्यांनी सांगितलं आहे.

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement