Take a fresh look at your lifestyle.

📋 MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

0

✒️ MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. सर्वाधिक पुण्यात विद्यार्थी आंदोलनाचा जोर पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री केलेल्या संबोधनात मोठी घोषणा केली.

✒️ MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख शुक्रवारीच म्हणजेच आज जाहीर होईल आणि परीक्षा येत्या 8 दिवसांच्या आतच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे.

Advertisement

✒️ काही जणांची अडचण वेगळी आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला परवानगी दिली आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादाची अट येणार नाही. आपली थोडीसी गैरसोय झालीय याबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो. हा चार-पाच दिवसांचा काळ लागतोय तो केवळ आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी लागत असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement

Leave a Reply