आपल्याकडे म्हंटले जाते की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”! आपण इतके जवळ झाडांना समजतो कि ती आपल्यातलाच, आपल्या कुटुंबातला एक भाग आहे असे आपल्याला वाटते. मात्र, आपल्या ओव्यांमधून आणि आपल्या संस्कृती मधून वृक्ष वृद्धीसाठी आणि वृक्ष संरक्षणासाठी आपल्याला संदेश देण्यात आले आहेत.
झाडे तोडू नयेत! असे अनेकदा बोलले जाते. मात्र, त्यांच्या संरक्षणाचा खर्च 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत येत असेल तर, तुम्ही यावर काय म्हणाल? आपण आज जाणून घेणार आहोत अशा झाडाविषयी ज्याचा खर्च सरकार स्वखुशीने करते.
मध्य प्रदेशामध्ये रायसेन जिल्ह्यात सांची स्तूप आहे. हे स्तूप मौर्य साम्राज्याचे सम्राट अशोका यांनी उभारल्याचे दाखले सापडतात. या स्तूपाजवळ एका टेकडीवर एक वृक्ष आहे, ज्याला 15 फुटी तारेचे कुंपण केलेले आहे. या झाडाचे एक पान जरी गळाले तरी देखील येथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या काळजात धडकी भरते.

काय असे विशेष आहे या झाडामध्ये? तर हे झाड म्हणजे बोधिवृक्षाच्या कुटुंबातील झाडांपैकी एक आहे. म्हणजे ज्या वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्ती करून घेतली ते वृक्ष! त्या बोधी वृक्षाच्या कुटुंबातील एक हिस्सा म्हणून, या वृक्षाची तेवढी काळजी घेतली जाते.
या वृक्षाला कुठला आजार होऊ नये, किंवा कीड लागू नये म्हणून विशेष टँकर आणून त्याला पाणी दिले जाते. वनाधिकारी आणि वृक्षाशी संबंधित तज्ञ इथे नेहमीच तपासणी करण्यासाठी येतात.
हा सांस्कृतिक वारसा जपावा या दृष्टीने सरकार देखील खूप प्रयत्नशील असते. या झाडाच्या बाहेर असणारे 15 फुटी तारेचे कुंपण आणि त्यानंतर त्याचेही संरक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात.
प्रत्येक जण आपली संस्कृती आणि आपल्या इतिहासाशी संबंधित असणारे हे वृक्ष असल्याने आदराने या पक्षाकडे पाहते.