Take a fresh look at your lifestyle.

एखादी वस्तु खराब असल्यास कुठे करावी तक्रार; ग्राहक म्हणून काय आहेत तुमचे हक्क ? जाणून घ्या..

0

ग्राहक म्हणून अनेकदा आपली फसवणूक होत असते. कधी कधी आपली स्वत:ची फसवणूक होते. मात्र अनेकदा आपल्या बाबतीत किंवा आपल्या नातेवाईक, मित्रांबाबत असे घडते की, त्यांनी खरेदी केलेली वस्तु खराब निघलेली असते आणि सदर दुकानदार वस्तु बदलून द्यायला तयार नसतो. मग अशावेळी काय भूमिका घ्यावी, हे आपल्याला समजत नाही. अशावेळी आपण ग्राहक म्हणून आपले काय अधिकार आहेत, हे समजून घेतले पाहिजेत.

सुरुवातीला आपण ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांविषयी जाणून घेऊयात..

Advertisement

जीवाला धोका पोहोचवणाऱ्या वस्तू आणि सेवांपासून संरक्षण मिळण्याचा हक्क ग्राहकांना आहे. वस्तू आणि सेवांविषयी सर्व माहिती घेण्याचा, वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तेबाबत खात्री करून घेण्याचा, ऐकण्याचा, शंका निवारण करून घेण्याचा आणि यासंदर्भातील माहिती घेण्याचा हक्क ग्राहकांना आहे.

कुणाकडे करावी तक्रार ?

Advertisement

तक्रार करण्याआधी आपली वस्तु दुकानदार परत घेत आहे का? हे एकदा तपासवे. त्याचा नकार असल्यास सदर वस्तूच्या कंपनीशी संपर्क साधावा. त्यांनीही नकार दिल्यास मग तुम्ही ग्राहक म्हणून दाद मागू शकता.
एक कोटीपेक्षा कमी किंमतीबाबतच्या तक्रारी जिल्हास्तरीय न्यायालयाच्या कक्षेत येतात.

एक कोटीपेक्षा जास्त पण 100 कोटीपेक्षा कमी किंमतीच्या तक्रारी राज्य आयोगाच्या कक्षेत येतात. तर 10 कोटीपेक्षा जास्त किंमतीबाबतच्या तक्रारी राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या कक्षेत येतात.
आता वस्तू किंवा सेवेच्या किंमतीनुसार तक्रार दाखल करण्यासाठी कार्यक्षेत्र निवडले जाते. यापूर्वी नुकसान भरपाईच्या मुल्यानुसार तक्रार कोणत्या आयोगाकडं करायची हे ठरवलं जात असे.

Advertisement

Leave a Reply