SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 11 मार्च 2021

मेष : प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. तुम्ही केवळ कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल.

Advertisement

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी फारच कमी होतील. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक जोडीदारावर आपल्या मनाचा चांगला प्रभाव पडेल. आपण घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल.

मिथुन : दैनंदिन खर्चाचे आज प्रमाण वाढेल. काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल. मेहनत, परिश्रमाचे चीज होऊ शकेल. मुलांप्रतिचा विश्वास वृद्धिंगत होईल. आत्मविश्वास वाढेल.

Advertisement

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे लवकर मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील. आपले कार्यक्षेत्र वाढेल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदाच होईल.

सिंह : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य कमी लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्तृत्त्वाला झळाळी येणाऱ्या घटना घडतील. आज सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल.

Advertisement

कन्या : तुम्हाला संततिसौख्य लाभेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण चांगले राहील. आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल. आजारी आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

तुळ : महत्त्वाची प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. आध्यात्मिक, आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. संतसज्जनांचा व मित्रांचा सहवास लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

Advertisement

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल व इतर कामे आज पूर्ण होतील. सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य लाभेल. पैसे खर्च होतील. हितशत्रू पराभूत होतील.

धनु : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील, पण थोडं लक्ष घाला. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचे सप्ताह ग्रासलेलं नैराश्‍य घालवेल. अमावास्येजवळ रोहिणी व्यक्तींनी व्हायरस जपावा.

Advertisement

मकर : संततिसौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना व्यावसायिक उत्सवप्रदर्शनांतून लाभ. प्रगतीची नवी दालनं उघडतील.

कुंभ : शासकीय व खाजगी कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कौटुंबिक चिंता लागून राहील. महाशिवरात्रीचा गुरुवार कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींसाठी महत्त्वाचा.

Advertisement

मीन : संततिसौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सप्ताहात बुद्धिजीवी मंडळींना मोठे सुंदर ग्रहमान राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तमोत्तम कल्पना सुचतील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ _*ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा*_ 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement