SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 11 मार्च 2021

✒️ महाबळेश्वर (सातारा) रोड येथे मालवाहू एसटी बस सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळली; जखमी चालक आणि वाहकाला ग्रामस्थ, ट्रेकर्स यांच्या मदतीतून दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश

✒️ नंदीग्राममध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी, गाडीत शिरताना पायाला किरकोळ जखम; काेलकात्याला हलविले

Advertisement

✒️ भारतात 1,85,665 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,09,35,803 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,58,213 रुग्णांचा मृत्यू

✒️ राज्यातील सर्व आमदारांची 30 टक्के वेतन कपात मागे, आमदारांना 1 एप्रिल 2021 पासून पूर्ववत वेतन मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घोषणा

Advertisement

✒️ विधानपरिषद कामकाज: रॅपिड अँटीजेन चाचणीचा बनावट अहवाल देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द – आरोग्यमंत्री राजेश टोपे

✒️ मनसुख हिरेण यांच्या कुटुंबियांची एटीएसकडून चौकशी, बँक व्यवहार देखील तपासणार; मनसुख हिरेण यांच्या केसचा कागदी अभ्यास केल्यानंतर आता एटीएसच्या टीमचा फिल्डवर जाऊन तपास

Advertisement

✒️ महाराष्ट्रात 99,008 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 20,99,207 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 52,610 रुग्णांचा मृत्यू

✒️ अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपनेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Advertisement

✒️ मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या; छत्रपती उदयनराजे भोसलेंचा संताप अनावर

✒️ नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, त्यामुळे तिथे प्रकल्प होणार नाही मात्र रिफायनरी प्रकल्प अन्यत्र होऊ शकतो: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Advertisement

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement