SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

😳 अँटीलिया स्फोटके प्रकरणात नवा खुलासा

▪️ सुरक्षा विश्लेषणाच्या अहवालानुसार, ज्या टेलीग्राम चॅनलवरुन स्फोटके ठेवण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली, त्याचे लोकेशन दिल्लीच्या तिहाड तुरुंगात

Advertisement

🔥 ठाण्यात एका रासायनिक कारखान्यात भीषण आग

▪️ घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल, खबरदारीचा उपाय म्हणून आज आजुबाजूच्या फॅक्टरी करण्यात आल्या बंद

Advertisement

🔱 आज महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर बंद

▪️ महाशिवरात्रीला 235 वर्षात पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद; बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे मंदिरही आज बंद, शिवभक्तांना मंदिराच्या बाहेरच दर्शन घेऊन परतावे लागणार

Advertisement

😷 कोवॅक्सिन लसीला ‘क्लिनिकल ट्रायल मोड’ वरुन हटवा

▪️ केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या एका तज्ञांच्या पॅनलनं  भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला ‘क्लिनिकल ट्रायल मोड’ वरुन हटवण्याची व आपत्कालीन उपयोगाची परवानगी दिली जावी अशी केली मागणी

Advertisement

😱 बंगळुरू: ‘त्याने’ महिलेचं फोडलं नाक !

▪️ झोमॅटो अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने महिलेचं फोडलं नाक, कंटेंट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने मारहाणीनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ केला शेअर

Advertisement

🚙 पश्चिम बंगाल: मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील हल्ला केला कोणी ?

▪️ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी यांच्या पायाला, खांद्याला आणि गळ्यावर जखमा, पायाच्या हाडालाही गंभीर दुखापत, केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे घटनेवर विस्तृत अहवालाची केली मागणी

Advertisement

🧐 WHO च्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर

▪️ 3 पैकी एका महिलेस शारीरिक, लैंगिक हिंसाचाराचा करावा लागतो सामना; संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सी व त्यांच्या भागीदारांनी केलेल्या अभ्यासात ही नवीन माहीती

Advertisement

🎭 प्रियांका चोप्रा जगातल्या सर्वात मोठ्या 27 कलाकारांपैकी एक!

▪️ ‘ब्रिटीशवॉग’ या मॅगझिनच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आवृत्तीमध्ये जगातल्या 27 मोठ्या स्टार्सच्या यादीमध्ये तिचंही नाव समाविष्ट; व्हिओला डेविस, रिझ अहमद, केट विनस्लेट, आन्या टेलर जॉय, टॉम हॉलंड आणि साशा बरॉन कोहेन यांच्यासोबत इतरही नावे

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement