SpreadIt News | Digital Newspaper

धक्कादायक – दीड वर्षांचा मुलगा आईच्या पोटातच गरोदर..

0

पुणे : साधारणपणे मुलगी गर्भवती होतात, हे आपण ऐकलेलं असतं. परंतु मुलगा गर्भवती राहिली हे जरा डेंजरच आहे. लांब कशाला आपल्या पुण्यात घडलंय हे. त्या मुलाचं वय किती असेल माहितीय का, फक्त दीड वर्ष. ते बाळ अर्ध्या किलोचे होते. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्या चिमुकल्यावर शस्त्रक्रिया केली आणि तो गर्भ बाहेर काढला.

हे कुटुंब नेपाळमधलं आहे. त्या मुलाचं पोठ सारखं दुखायचं. त्याचं पोट गरोदर महिलांप्रमाणे वाढू लागलं होतं. त्यातच परिस्थिती हलाखीची असल्याने त्या कुटुंबाने उपचारासाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. तेव्हा बालरोग तज्ज्ञ डॉ. शैलजा माने यांनी अपेक्षित सर्व चाचण्या करुन घेतल्या तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली.

Advertisement

त्या आईच्या पोटात दोन गर्भ होते. त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेला. ते जन्मानंतर बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत गेली, त्यामुळे बाळाला योग्य आणि पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. पुढे जाऊन इतर अवयवांवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉक्टरांनी तो गर्भ काढला. परंतु तो मृतावस्थेत होता.

सोनोग्राफी आणि सी टी स्कॅन अहवालाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार हा गर्भ बाळाच्या यकृत आणि उजव्या बाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध होता. तो मोठ्या रक्त वाहिन्यांना चिकटलेला असल्याचे दिसून आले. हा गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले.

Advertisement

बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव आणि त्यांच्या टीमने सहा तास शर्थीचे प्रयत्न केले. शरीराबाहेर काढलेल्या गर्भ गाठीचे परीक्षण करण्यात आले. आता त्या बाळाला कोणताच धोका असणार नाही. या गर्भ गाठीचे वजन 550 ग्रॅम होते. हात आणि पायची बोटे, त्वचा, केस, हाडे तसेच मायक्रोस्कोपमध्ये इतरही अवयव दिसून आले. यावरुन हे ‘फिट्स इन फिटू’ असल्याचे निदान झाले.

Advertisement