SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग – MPSC ची पूर्व परिक्षा 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुन्हा लांबणीवर!

महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्वतः आज प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

अशातच 14 तारखेला होणारी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेची होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिपत्रक जारी केले आहे.

Advertisement

🤱 धक्कादायक – दीड वर्षांचा मुलगा आईच्या पोटातच गरोदर, पुण्यातील प्रकार..❗

👀 वाचण्यासाठी क्लिक करा : http://bit.ly/3bBhvmr

Advertisement

चार दिवसांवर परीक्षा येऊन ठेपलेली असताना असा अचानक घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्कादायक आहे! कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या आधी देखील ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

14 मार्चला जर ही परीक्षा होणार नसेल तर, नवीन तारीख कोणती हा प्रश्न सहाजिकच प्रत्येकाला पडला आहे. तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर मात्र, काही काळाने तुम्हाला मिळेल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितले आहे.

Advertisement

महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, आयोगाला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 वर्षासाठी होणारी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आता पुढे ढकलली आहे. यथावकाश याचा नवीन दिनांक लवकरच सांगण्यात येईल, असे देखील आयोगाने सांगितले!

📣 विद्यार्थ्यांची निदर्शने
आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचे कळताच पुणे आणि अहमदनगर येथे परीक्षार्थींनी निदर्शने केली. पुण्यात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. अहमदनगरमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दिल्ली दरवाजा येथे निदर्शने केली

Advertisement