SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन बंगल्यात एका व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न, वाचा सविस्तर प्रकरण

राज्यात काही दिवसांपासून अधिक चर्चा असणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्यात एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

रॉयल स्टोन बंगल्यात विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने अचानकपणे स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधाने या व्यक्तीला अडवलं आणि मोठा अपघात व्हायचा टळला.

Advertisement

‘ती’ व्यक्ती कोण ?

सदर व्यक्ती अहमदनगर नेवासा येथील झापडी गावची रहिवाशी आहेत. पांडुरंग वाघ असं त्यांचं नाव असून
त्यांनी राज्य सरकारकडून 2018 साली वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनास 8,72,000 रुपये भरले होते आणि पांडुरंग वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केलं होतं. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा करू शकले नाही.

Advertisement

गावकऱ्यांच्या नेहमीच्या वारंवार विरोधामुळे वाघ यांना प्रचंड नुकसान होत होतं. लाखो रुपये भरूनही शासनाकडून वाळू उपसण्याचं काम काम करता येत नव्हते. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते.

पांडुरंग वाघ यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला, काम सुरू करण्यासाठी अटी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यात गावकऱ्यांनी काहीच ऐकले नाही, परिणामी त्यांना काही यश आलं नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पांडुरंग वाघ यांनी पुन्हा शासनाचे दार ठोठावले आणि आपले शासनाकडे भरलेले पैसे परत मिळावे म्हणून यांनी पाठपुरावा सुरू केला आणि तेथे चकरा मारण्याचे काम सुरू केले.

Advertisement

पांडुरंग वाघ यांनी भरलेले 8 लाख 72 हजार रुपये त्यांना लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य वेळी पोलीसांनी वाघ यांना अडवलं आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी 41 (1) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली. तसेच या पुढे असं पाऊल न उचलण्यासाठी समज सुद्धा पोलिसांनी वाघ यांना दिली.

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement