SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पंतप्रधान मोदींपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांना मिळतो ‘एवढी’ पगार; जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती

‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’ ही म्हण आपण सगळ्यांनी ऐकली असेल. आपल्या घरचेही अधून मधून म्हणत असतात की, आधी घरच्या जेवणाची सोय करा आणि मग समाजसेवा करा… म्हणजे एकूणच काय तर समाजसेवक असू दे नाहीतर नेता… त्यांनाही घर चालवायची जबाबदारी असते.

आणि म्हणूनच पंतप्रधानापासून तर मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, संसद सदस्य.. अशा सर्वच लोकप्रतीनिधींना विशेष पगार असतो.

Advertisement

जाणून घ्या, कुणाला किती असतो पगार…

राज्यांच्या राज्यपालांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांचे पगारही प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर 4.10 लाख रुपये महिन्याला पगार घेतात. सर्वाधिक पगार घेत असलेले मुख्यमंत्री अशी चंद्रशेखर राव यांची ओळख आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दरमहा 3..4 लाख रुपये घेतात.

Advertisement

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 75 नुसार पंतप्रधान मोदींना मासिक 2 लाख रुपयांच्या पगारासह इतर अनेक फायदे मिळतात, ज्यात राजधानी दिल्लीतील निवासस्थान, आयएएफ वैमानिकांसह बोईंग 777-300ERs विमान, विशेष सुरक्षा आणि बरेच काही आहे.

राज्यसभा आणि लोकसभा खासदाराला संसदेच्या प्रत्येक सदस्याला दरमहा 1 लाख रुपये पगार दिला जातो.
राज्यांमध्ये नियुक्त केलेले राज्यपाल संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी जवळून काम करतात. त्यांच्या पगारात राज्याप्रमाणे बदल होत असतात. असे असले तरी संसदेने राज्यपालांना दिलेला पगार दरमहा साडेतीन लाख रुपये आहे.

Advertisement

उपराष्ट्रपती साधारणपणे 4 लाख तर राष्ट्रपती महिन्याला 5 लाख रुपये पगार घेतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement