पिंक सिटी म्हणून ओळख असणार्या जयपूरची महापौर एक अवघ्या 8 वर्षाची मुलगी बनली, हे वाचून थोडे आश्चर्य वाटले असेल न?… मात्र ही मुलगी अवघ्या 1 दिवसाची महापौर बनली आहे.
ही स्टोरी वाचून तुम्हाला अनिल कपूरच्या ‘नायक’ या फिल्मची आठवण आली असेल. जयपुर नगर निगम हेरिटेजचे महापौर यांनी स्वत: पुढे येत या 8 वर्षीय छोट्याश्या मुलीला महापौर केले.
वास्तविक पाहता, जयपूरच्या रामराज पुरा कॉलनीत राहणारी ओमप्रकाश जाजोरियाची यांची ही छोटीशी मुलगी इशिता एक दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. ती बोलू शकत नाही, मात्र तरीही जयपूरच्या महापौर मुनेश गुर्जर यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त तिला महापौर बनविण्याचा निर्णय घेतला.
महापौर झाल्यावर इशिता यांनी एक आदेश बजावत सांगितले की, शहर स्वच्छ व साफ करण्याचे आपले लक्ष्य आहे. वस्तुतः या मुलीच्या उपचारांचा आणि शिक्षणाचा खर्च महापौर उचलत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना या मुलीबद्दल माहिती मिळाली.
या मुलीचे वडील गरीब आहेत आणि तिच्यावर उपचार करण्यात अक्षम आहे. म्हणूनच महापौरांनी तिला दत्तक घेतले आहे. त्याशिवाय महापौर मुनेश गुर्जर यांनी सांगितले की, दररोज अर्धा तास मी महिलांच्या तक्रारी सोडवण्यासाठी वेळ काढणार आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने महापौरांनी घेतलेल्या या निर्णयाचे जगभर कौतुक होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit