मुंबई :
सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. देशातील अनेक शहरात पेट्रोलचे भाव शंभरी तर डिझेलचे भाव ऐंशी पार आहेत. सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल कर कमी करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे तर विरोधक राज्य सरकारला कर करण्यास सांगत आहे.
याच मुद्दयावरुन उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांनी पुन्हा एकदा ‘ पेट्रोल डिझेलचे वाढते दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबार चाललेत, अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ’ असे म्हणतविरोधी पक्षाला आवाहनवजा चिमटा काढला.
संपूर्ण अधिवेशन काळात विरोधी पक्षाने एकदम अभ्यासू आणि प्रत्येक मुद्द्यावर दमदार भूमिका घेतली. काही मुद्दे असे होते की, ज्यामुळे सत्ताधारी पक्ष आपोआप बॅकफूटला गेले. संजय राठोड, मनसुख हिरेन, सचिन वाझे अशा मुद्द्यांवर सत्ताधारी बॅकफूटला आल्याने आता पुन्हा विरोधी पक्षांना टार्गेट करता येईल अशा इंधन दरवाढ या मुद्द्याला घेऊन अजित पवारांनी विरोधकांना टोले टोमणे हानले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit