SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अजित पवारांनी केली मोठी घोषणा; आता आमदारांना मिळणार ‘एवढा’ निधी

मुंबई :
मागच्या वर्षी याच काळात देशभरात आणि जगभरात कोरोनाचे संकट वाढलेले होते. आरोग्य कर्मचारी, प्रशासन व्यवस्थाही मोठ्या प्रमाणावर रिस्क घेऊन कोरोनाविरोधात काम करत होती. यावेळी अनेक लोक पुढे येऊन कोरोनाविरोधात लढण्यासाठी निधी दिले जात होते. याच दरम्यान अनेक लोकप्रतींनिधींनी आपल्या निधीत कपात केली होती. तसेच सरकारच्या तिजोरीवरील ओझे वाढल्यानेआमदारांच्या मासिक वेतनामध्ये 30 टक्के कपात करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवरनुकत्याच पार पाडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांच्या निधीतील ही 30% कपात मागे घेतली जाणा असल्याचे सांगितले.

Advertisement

याच वेळी अजित दादांनी एक मोठी घोषणा केली. पवार यांनी बुधवारी विधानसभेत बोलत असताना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा आमदार निधी आता 1 कोटी रुपयांनी वाढवणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

याआधी 3 कोटी रुपये आमदार निधी मतदारसंघाच्या विकासासाठी मिळत होता. पण, आता नवीन घोषणेनुसार प्रत्येक आमदाराला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाच सर्वपक्षीय आमदारांनी स्वागत केलं आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

 

Advertisement