SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जाणून घ्या OK या शब्दाचा रंजक इतिहास..

आपल्या देशामध्ये परकीय भाषांपैकी इंग्रजी ही आपसूकच रुळून गेली. आपल्या प्रत्येकाच्या जिभेवर आपली प्रथम भाषा आणि नंतर इंग्रजी सहज येते. यामधील काही शब्द आणि त्यांचे अपभ्रंश प्रचलित भाषेमध्ये देखील प्रवाहाने आणि ओघाने आले. यापैकी एक शब्द म्हणजे ओके! या शब्दाचा इतिहास, उगम आणि अपभ्रंश नेमका झाला कसा? त्याचा अर्थ काय? याबाबत आज आपण जाणून घेऊ!

1830 च्या दशकाच्या शेवटी ‘ओके’ शब्दाचा वापर करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी एखादा शब्द पूर्ण बोलण्याऐवजी शॉर्ट फॉर्ममध्ये बोलण्याचा ट्रेंड होता. ओके या शब्दाचा शोध अपभ्रंश झाल्याने म्हणजे चुकीच्या उच्चारामुळे लागला होता.

Advertisement

OK किंवा ओके शब्दाचा प्रयोग सर्वात पहिल्यांदा 1839 मध्ये झाला. या शब्दाचा फुल फॉर्म ‘oll korrect’ असा आहे.

OK चे इतर काही फुल फॉर्म जे आपल्याला माहिती नाहीत, तेही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात!

Advertisement

OK – All Correct
OK – All Clear
OK – Okay
OK – Objection Killed
OK – Objection Knocked
OK – Oll Korrect

OK शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला?

Advertisement

OK हा शब्द अमेरिकतल्या बोस्टन शहरात म्युनिसिपल कॉर्पोरेशन द्वारा लागू केल्या गेलेल्या एका कायद्याविरोधात Anti-Bell-Ringing-Society शी संबंधित आहे.

काही तज्ञांच्या मते, स्कॉटिश शब्द och aye म्हणजे oh yes किंवा ग्रीक शब्द ‘ola kala’ म्हणजे “All Good” या शब्दांचा अपभ्रंश होऊन ok या शब्दाची निर्मिती झाली असावी, असे बोललं जाते.

Advertisement

या शब्दांचा अर्थ आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला या शब्दाची खोली आणि आणि प्रचलित होण्यामागची कारणे लक्षात येतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे, हे समोरच्याला कळवण्यासाठी वापरला जाणारा हा इंग्रजीतला छोटासा शब्द आपल्या संभाषणाचा अविभाज्य घटक कधी होऊन गेला हे आपल्यालाही कळले नाही.

Advertisement