SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😨 तुम्हाला माहिती आहे का ? दूषित पाण्यामुळे दरवर्षी भारतात होतात तब्बल ‘इतके’ लाख मृत्यू

💧 भारतातील भूजल आणि भूतलावरील पाणी अतिशय दूषित असून केवळ 32 टक्के भारतीय घरांमध्ये प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी मिळते.

🤕 दरवर्षी या दूषित पाण्याशी निगडित आजारांमुळे सुमारे 3 लाख मुले मृत्युमुखी पडतात. अतिसारासारख्या आजारामुळे 50 टक्के लोकांचा मृत्यू होतो. बंगळुरू व नोएडा येथील ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी’ यांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे.

Advertisement

🔎 अभ्यासात काय ?

▪️ भारतातील 24 राज्यांमधील बहुतेक जिल्ह्य़ांमध्ये भूजलात जड धातू आणि इतर धातूंचे प्रमाण अधिक आहे. या पाण्यामुळे टायफाईड, कॉलरा, अतिसार, कर्करोग, हाडांशी संबंधित आजार होतात.

Advertisement

▪️ दरवर्षी सुमारे 37.7 दशलक्ष लोकांना या आजाराचा त्रास होतो आणि दरवर्षी सुमारे 73 दशलक्ष कामकाजाचे दिवस वाया जातात.

▪️ या आजारामुळे कामावर परिणाम होतो. त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पादकतेवर होतो. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर आर्थिक भार पडतो.

Advertisement

▪️ भारतातील सुमारे 640 जिल्ह्य़ांमधून हा अभ्यास करण्यात आला आहे. जर अक्षय ऊर्जेचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी करुन सर्व घरांना ते पुरवल्यास दरवर्षी 10 हजार 900 ते 11 हजार 700 कोटी रुपये खर्च येईल.

▪️ औष्णिक ऊर्जा वापरून केलेल्या पाणी शुद्धीकरणाच्या तुलनेत हा खर्च 40 ते 60 टक्क्यांनी कमी होईल. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होईल, असेही निरीक्षण या अभ्यासात मांडण्यात आले आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement