भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आहे की, IDBI Bank सोबत आणखी 2 सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याला बँक कर्मचाऱी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.
सरकारी बँकांचे खासगीकरण होणार आहे, त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरी जाण्याची धाकधूक वाढली आहे. ‘खासगीकरण केल्याने बँकांचा विकास होईल हा सरकारचा भ्रम आहे. खासगीकरण ग्राहकांना सुरक्षा देऊ शकत नाही’, असा आरोप या संघटनांचा आहे. यामुळे या संघटनांनी पुढच्या आठवड्यात लागोपाठ 2 दिवस संप करणार असल्याची घोषणा केली आहे.
यामुळेच बँका उद्यापासून फक्त एक दिवस सुरु राहणार आहेत. तुमचे जर या दरम्यान बँकेत महत्वाचे काम असेल तर आज आणि शुक्रवारीच बँका सुरु राहणार आहेत. त्यामुळे तुमचा खोळंबा होण्यापेक्षा या 2 दिवशी काम लवकर आटोपून घ्या.
कोणत्या दिवशी बँका बंद आणि सुरू राहणार –
काही बँकांच्या खासगीकरण होत आहे, यामुळे सरकारी बँकांचे कर्मचारी 15 आणि 16 मार्चला संपावर जाणार आहेत. या संपाची घोषणा 9 बँक युनियन्सची केंद्रीय संघटना यूनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियनने केली आहे. याचा थेट परिणाम सरकारी बँकांच्या कामावर आणि लोकांवर होणार आहे.
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियावर बँकांच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या या संपाचा मोठा परिणाम होणार आहे. तशी माहितीही बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. या संपाचा परिणाम फक्त बँकांवरच नाही तर बँकेच्या खातेदारांवर, ग्राहकांवरही होणार आहे.
पाहूया.. नेमकं सुट्टया कधी ?
▪️ 11 मार्च – महाशिवरात्र
▪️ 13 मार्च – दुसरा शनिवार
▪️ 14 मार्च – रविवार
▪️ सोमवार 15 मार्च, मंगळवार 16 मार्च – 2 दिवस संप
बँक सुरू – 12 मार्चला बँका सुरु राहणार
जर बँकेची काही महत्वाची कामे असतील तर ती 11 मार्चआधीच म्हणजे आजच करा. नाहीतर 11 मार्च ते 16 मार्च अशा 6 दिवसांमध्ये केवळ एकच दिवस कामकाज सुरु असल्याने बँकांमध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit