SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी: पोस्ट ऑफिस बचत खातेधारक आता खात्यातून एकाच वेळी ‘इतके’ पैसे काढू शकतात..

पोस्ट ऑफिसमधील बचत खात्याचे पैसे काढण्याचे नियम आता बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला जास्तीचे पैसे आता तरी काढता येणार आहेत. भारतीय पोस्टने पोस्ट ऑफिसमधील खातेदारांसाठी आवश्यक नियम बदलून दिलासा दिला आहे.

सरकारने सांगितलं की, इंडियन पोस्टने पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये पैसे काढण्याची मर्यादा वाढविली आहे. यामुळे पोस्ट ऑफिस बचत योजना बँकांशी स्पर्धा करू शकणार आहेत. तसेच टपाल कार्यालयातील ठेवींचा कालावधीतही वाढ होईल, असे पोस्टाला वाटत आहे.

Advertisement

एका दिवसात किती रुपये काढू शकता ?

या नव्या नियमामुळे ग्रामीण टपाल विभागातील खातेदार एका दिवसात 20,000 रुपये काढू शकतात. आधी पैसे काढण्याची ही मर्यादा 5,000 रुपये होती. यासोबतच कोणत्याही शाखेचे पोस्टमास्टर (BPM) एका खात्यात एका दिवसात 50,000 पेक्षा जास्त रोख ठेव व्यवहार स्वीकारणार नाही. म्हणजे एका खात्यात एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करता येणार नाहीत.

Advertisement

PPF, KVP, NSC चे कोणते नियम बदलले ?

बदललेल्या या नियमांनुसार, बचत खात्यांसोबतच आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (NSC), मासिक उत्पन्न योजना (SCSS), किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) या अशा योजनांमध्ये पैसे काढणे असो वा करणे असो हे जमा चेकच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहेत. तसेच काढताही येऊ शकणार आहेत.

Advertisement

खात्यात किमान किती शिल्लक हवी ?

पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यावर तुम्हाला 4 टक्के वार्षिक व्याज मिळते, पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या बचत खात्यासाठी किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. आपल्या खात्यात 500 रुपयांपेक्षा कमी पैसे असल्यास 100 रुपये खाते देखभाल फी (मेंटेनन्स) म्हणून कपात करण्यात येणार आहे.

Advertisement

पोस्ट ऑफिस योजना –

1) पोस्ट ऑफिस बचत खाते
2) 5 वर्ष पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते
3) पोस्ट ऑफिस मुदत ठेव खाते
4) पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते
5) ज्येष्ठ नागरिक बचत योजना
6) 15 वर्ष सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते
7) सुकन्या समृद्धी खाते
8) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
9) किसान विकास पत्र

Advertisement

पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याज –

योजनेचे व्याज (टक्के / वार्षिक) पोस्ट ऑफिस बचत खाते

Advertisement

▪️1 वर्षाचे टीडी खाते – 5.5
▪️ 2-वर्षाचा टीडी खाते – 5.5
▪️ 5 वर्ष टीडी खाते – 6.7
▪️ 5-वर्षाची आरडी – 5.8
▪️ ज्येष्ठ नागरिक बचत योजना – 7.4
▪️ पीपीएफ – 7.1
▪️ किसान विकास पत्र – 6.9
▪️ सुकन्या समृद्धि खाते – 7.6

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement