SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वतःला अपडेटेड ठेवायच असेल तर दिवसभरातील या ठळक घडामोडी नक्की वाचा

◼️ मराठा आरक्षण: राज्यांना मागास प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार नसल्याचे सांगून दुसरीकडे या आरक्षणामागील असाधारण व अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याची जबाबदारीही राज्यांचीच असल्याची केंद्र सरकारची भूमिका; “केंद्र म्हणते आत्मनिर्भर व्हा!” अशी अशोक चव्हाण यांची उपरोधिक टीका

◼️महाराष्ट्रातील अमरावती, यवतमाळ, मुंबई, औरंगाबाद, नागपूर हे जिल्हे कोरोनाच्या विळख्यात; या जिल्ह्यांत वरचेवर वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने चिंतेत भर!

Advertisement

◼️बंगालमधील नंदिग्राम निवडणूक रॅली मध्ये ममतादीदींनी भाजपला खडसावले; हिंदुत्ववाद मला सांगू नका म्हणत, आपण हिंदू मुलगी असल्याची वाच्यता!

◼️ “काहींना संधी मिळत नाही, काहींना संधी सहज मिळते, तर काहींना मिळालेल्या संधीचे सोने करता येत नाही. मात्र, अमृता ताईंनी आपल्या मिळालेल्या संधीचे सोने करावे त्यांना गाण्यासाठी शुभेच्छा” म्हणत रोहित पवारांनी केले ट्विट!

Advertisement

◼️आजच्या दिवसात शेअर बाजारात चांगली वाढ; बीएसई सेन्सेक्स 584.4 अंक म्हणजेच 1.16 टक्क्यांच्या तेजीसह पुन्हा एकदा बंद तर निफ्टी निर्देशांक 81.70 अंकांच्या म्हणजेच 0.55 टक्क्यांच्या तेजीसह 15,037.90 वर बंद!

◼️ चीनचा सायबर हल्ल्यानंतर भारताच्या वीजपुरवठा आणि स्टॉक मार्केटवर परिणाम झाल्याचा आरोप होत असतानाच, केंद्र सरकार सायबर सुरक्षा वाढविण्याचे राष्ट्रीय धोरण तयार करण्याच्या गडबडीत!

Advertisement

◼️उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव “लव सुलभ” या नव्या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; ईशा केसकर, प्रथमेश परब, प्रियदर्शन जाधव, प्रविण तरडे, मंगेश देसाई अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे नुकतेच झाले टीजर पोस्टर लॉन्च!

◼️ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी कोरोना पॉझिटिव आल्याने क्रिकेट बोर्डाचे ऑफिस बंद करण्याची नामुष्की; याआधीही 6 क्रिकेटपटू आणि एका सहकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगही स्थगित करण्यात आली होती!

Advertisement

◼️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरून निर्माण झालेला गोंधळ अखेर संपला; प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या बहुपर्यायी प्रश्‍न पद्धतीने 50 गुणांच्या ऑनलाइन परीक्षेला 11 एप्रिलपासून होणार सुरवात!

◼️ द फॅमिली मॅन वेबसिरीज चाहत्यांसाठी गुड न्यूज: मनोज वाजपेयी याची फॅमिली मॅन 2 हि वेब सिरीज नक्कीच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; वेबसिरीज प्रदर्शित होणार नसल्याच्या अफवेवर निर्मात्याने अखेर सोडले मौन!

Advertisement


💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि मनोरंजन 🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement