SpreadIt News | Digital Newspaper

JEE Main 2021 फेब्रुवारी सेशनचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

0

JEE Main 2021 फेब्रुवारी सेशनचा परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 26 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन ही परिक्षा घेतली गेली. यासोबतच JEE Main 2021 परीक्षेचा फेब्रुवारी सेशनचा निकाल अवघ्या दहा दिवसांमध्ये जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी तीन भाषांमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा यावर्षी तेरा भाषांमध्ये घेण्यात आली होती.

देशभरातून 6 लाख 20 हजारांच्या जवळपास विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. त्यातील सहा विद्यार्थी हे देशातून या परीक्षेत 100 पर्सेंटाइल (NTA score) मिळवून टॉपर आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रतून सिद्धार्थ मुखर्जी या विद्यार्थ्याने सुद्धा या सहा टॉपर्समध्ये आपले स्थान मिळविले आहे. याशिवाय संकेत जहा, (राजस्थान), प्रवीण कटारिया (दिल्ली), रंजीम दास (दिल्ली), गुरमीत सिंग (चंदिगड), अनंत किंदबी (गुजरात) या विद्यार्थ्यांनी सुद्धा 100 पर्सेंटाइल गुण मिळवून देशात टॉपर्सचे स्थान मिळवले आहे.

Advertisement

कोरोना प्रादुर्भाव विचारात घेता यावर्षी विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी या परिक्षेसाठी मिळावी म्हणून यंदा JEE Main 2021 परीक्षा चार महिन्यांमध्ये म्हणजेच 4 सेशनमध्ये घेतली जातीये. यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात ही परीक्षा विद्यार्थ्यांना आपली बोर्ड परीक्षेचा वेळापत्रक पाहून व त्या प्रकारे नियोजन करून देता येणार आहे. विद्यार्थी ही परीक्षा 4 सेशनमध्ये कोणत्याही सेशनमध्ये अर्ज भरून देऊ शकतात. मात्र 4 सेशनमध्ये ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण त्या परीक्षेत मिळालेले गुण अंतिम गुण म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

जेईई मेन 2021 चा निकाल पाहण्यासाठी या पायऱ्यांचे अनुसरण करा

Advertisement
  • विद्यार्थ्यांना सर्वप्रथम jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
  • होम पेजवर दिलेल्या रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • उघडलेल्या नवीन पृष्ठावरील आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आपला निकाल आपल्या समोर येईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement