SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जन धन योजना : खातेदारांमध्ये 55% वाटा महिलांचा, जाणून घ्या पीएमजेडीवाय 2.0 काय आहे ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या भाषणात जन धन योजनेची घोषणा केली. 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. देशातील आर्थिक समावेशास प्रोत्साहन देणारी ही सरकारची महत्वाची योजना आहे.

जनधन योजनेचे उद्दिष्ट्ये – भारतातील प्रत्येक कुटूंब बँकिंग प्रणालीशी जोडणे, आर्थिक साक्षरतेचा प्रसार करणे, पत, विमा आणि निवृत्तीवेतनाची सुविधा सुनिश्चित करणे

Advertisement

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहीतीनुसार, प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) च्या एकूण खातेदारांमध्ये महिलांचा वाटा 55 टक्के आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अनेक योजनांमध्ये महिलांच्या सहभागाची माहिती सांगत या अशा उत्कृष्ट योजनांमुळे महिलांना त्यांचे जीवन आणि उद्योजक म्हणून त्यांचे स्वप्न साकार करण्यास मदत झाली आहे.

Advertisement

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की,

25 फेब्रुवारी 2020 पर्यंत पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत उघडलेल्या एकूण 41.93 कोटी खात्यांमधील एकूण महिला खातेदारांची संख्या 23.21 कोटी आहे.

Advertisement

पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) संदर्भात, असे म्हटले आहे की, महिला उद्योजकांना या योजनेअंतर्गत 6.36 लाख कोटी रुपये (26 फेब्रुवारी 2021 पर्यंत) सुमारे 68 टक्के किंवा 19.04 कोटी खाती मंजूर केली गेली आहेत.

पीएमजेडीवाय 2.0 काय आहे ?

Advertisement

केंद्र सरकारने अनेक वैशिष्ट्ये आणि फायद्यांसह पीएमजेडीवाय 2.0 लाँच केले.

नव्या आवृत्तीत, प्रत्येक कुटुंबात एक बँक अकाऊंट ऐवजी प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे किमान 1 बँक अकाऊंट आहे हे सुनिश्चित करण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे.

Advertisement

28 ऑगस्ट 2018 नंतर खुल्या अकाऊंटसोबत असलेल्या रुपे कार्डवरील विनामूल्य विमा संरक्षण 2 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.

ओव्हरड्राफ्टची मर्यादा दुप्पट केल्याने कोणत्याही अटीशिवाय 10,000 आणि 2000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचीही घोषणा केली गेली.

Advertisement

रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 2 वर्षांपासून कोणताही व्यवहार केला नाही तर पीएमजेडीवाय खात्यास निष्क्रिय मानले जाते..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement