SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 8 मार्च 2021

मेष – खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. अपयशाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल. कामातील बदलांकडे लक्ष द्यावे.

Advertisement

वृषभ – अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारात हुशारी दाखवाल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. लहरीपणे वागू नये. गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा. वाद विवादात भाग घेणे टाळा.

मिथुन – मनातील इच्छा पूर्ण होईल. कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांशी भेटी वाढतील. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल.

Advertisement

कर्क – आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्‍यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. ध्यान धारणे साठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपा.

सिंह – प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल. नाकाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. साहसी निर्णय घ्यावेत.

Advertisement

कन्या – भावंडांशी मतभेद संभवतात. चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. घरातील वादामध्ये लक्ष घाला. स्थावरच्या कामाला गती येईल. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

तूळ – हातापायास किरकोळ इजा संभवते. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मैदानी खेळ खेळता येतील. चपळाईने कामे हाती घ्याल. आपल्यातील हूनर दाखवून द्यावे.

Advertisement

वृश्चिक – आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. कर्तव्याला चांगला दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. स्वभाव विरोध दर्शवू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

धनू – स्वत:मध्ये काही बदल कराल. प्रवासात काही त्रास होण्याची शक्यता आहे. अडथळ्यातून मार्ग काढावा. वेळेचे नियोजन करा. कष्ट वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल. मित्रांशी वाद घालणे टाळा.

Advertisement

मकर – त्रासातून मार्ग निघेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. हिंमतीने कामे हाती घ्याल. पित्त विकार बळावू शकतात. भांडण करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील. उष्णतेचे त्रास संभवतात.

कुंभ – नवीन मित्र जोडावेत. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. वैवाहिक सुख वाढेल. मानसिक चांचल्या जाणवेल.

Advertisement

मीन – कामाचा आवाका लक्षात घ्यावा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराचा साथ लाभेल. आकर्षणाला बळी पडाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी चांगले वागाल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement