SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा झटपट आढावा!

भारताच्या लसीने जगाला प्राणघातक कोरोना महामारीतून वाचवलं :अमेरिकी शास्त्रज्ञ

ह्युस्टनमधील बायलोर कॉलेज ऑफ मेडिसिन येथील नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे डीन पीटर होटेझ म्हणाले की, भारताची लस परिणामकारक असून त्या लसीने जगाला कोरोनाच्या संकटातून वाचवले आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल-डिझेल वर कोणतीही घोषणा नाही; सामान्यांचा !

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये आज महाराष्ट्राच्या साल 2021-22 च्या अर्थसंकल्पात विषयीच्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वसामान्यांना अपेक्षित असलेल्या इंधन दरवाढीवर मात्र कोणतीही घोषणा झाली नाही. इंधनाचे दर कमी होण्याबाबत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्की घोषणा करतील, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या सर्वसामान्यांचा हिरमोड आज झाला आहे!

Advertisement

भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजचा अनोखा विक्रम; श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या लाही टाकले मागे!

मिताली सर्वात जास्त काळ एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द असलेली दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरली असून, याबाबतीत मितालीने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्याला मागे टाकलं आहे. या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजही अव्वल स्थानी आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा भाई जगताप यांचा गंभीर आरोप!

विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये नेहमीच खडाजंगी पाहायला मिळते. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना फक्त सतत डोळ्यासमोर मुंबई महानगरपालिका, उद्धव ठाकरे, आणि महाविकासआघाडी दिसत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा गंभीर आरोप भाई जगताप यांनी केला आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय महिला दिनी संसदेत महिला खासदारांची 50 टक्के आरक्षणाची मागणी!

आंतरराष्ट्रीय महिलादिनी महिलांना 50 टक्के आरक्षणांची मागणी संसदेत करण्यात आली. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी 50 टक्के आरक्षणाची मागणी!

Advertisement