SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्राचा पूर्ण अर्थसंकल्प एका क्लिकवर

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा आज आपण जाणून घेऊ!

 • आरोग्य विभागासाठी 7500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याची घोषणा
 • पोस्ट कोविड उपचारांसाठी प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये समुपदेशन विभाग सुरू करण्याचा निर्णय
 • शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी रुपये किमतीचे कामांना प्रशासकीय मान्यता; तसेच इंदापूर बारामती तालुक्यातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्यासाठी कोट्यावधींची सिंचन योजना
 • जलसंपदा विभागामध्ये जलस्रोतांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी आणि जलसंवर्धन योजनेअंतर्गत 12951 कोटी रुपयांचा निधी
 • अर्थसंकल्पामध्ये रोजगार निर्मितीचे आणि कल्याणकारी योजनांच्या बरोबरच पायाभूत सुविधांसाठी तरतूद

 

Advertisement
 • हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झाल्याची माहिती
 • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील साडेदहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गाच्या तसेच दोन किलोमीटर लांबीच्या दोन पुलांचा समावेश असणारे 595 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू 2022 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
 • पुण्यातून चक्राकार मार्गाची उभारणी करण्यासाठी 170 किलोमीटर लांबीचा रस्ता बनविण्यासाठी 26 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे काम हाती घेतले
 • महाराष्ट्राच्या नव्या पर्यटन धोरणामध्ये 1367 कोटींची तरतूद; महाबळेश्वर-पाचगणी लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार
 • महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारणार तसेच सांस्कृतिक कार्य विभागासाठी 121 कोटी रुपये मंजूर
 • प्राचीन मंदिरांचे जतन करण्यासाठी 101 कोटी रुपये निधी मंजूर

 

 • धान्य साठवण्यासाठी 280 नवीन गोदामे
 • अन्न व नागरी पुरवठा विभागात साठी 321 कोटी रुपये
 • गृह विभागासाठी सतराशे कोटी रुपयांची तरतूद
 • गृहनिर्माण विभागासाठी 931 कोटी रुपये मंजूर महिलांसाठी विशेष
 • महिलादिनी अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामुळे महिलांसाठी जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
 • महिलेच्या नावावर घर असल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार

 

Advertisement
 • शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंत मुलींना मोफत बसप्रवास
 • महिला आणि बालविकास विभागासाठी केंद्राकडून 1398 कोटी रुपये
 • घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना 250 कोटींचे बीजभांडवल
 • उद्योग विभागासाठी 3500 कोटी रुपये
 • 25 हजार मेगावॅट चे अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प उभारणार

 

 • ऊर्जा विभागासाठी 9000 कोटी रुपये मंजूर
 • नगर विकास विभागासाठी च्या महत्त्वाच्या घोषणा मध्ये मुंबई पूर्व पश्चिम दृतमार्गालगत सायकलिंग मार्ग उभारणार
 • मुंबईत सांडपाण्यासाठी 19500 कोटी रुपये मंजूर
 • मिठी नदी प्रकल्पासाठी चारशे कोटी रुपये, तर नगरविकास विभागाला 8420 कोटी रुपये, मंजूर खादी ग्रामोद्योग साठी देखील 70 कोटी रुपयांची तरतूद
 • मुंबईमध्ये रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार

 

Advertisement
 • वसई ते कल्याण जलमार्ग सुरू होणार मुंबई ठाणे आणि नवी मुंबई जलमार्गाचा वापर वाढवणार तर कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा- भाईंदर येथे जेटी उभारणार
 • बाळासाहेबांच्या स्मारकासाठी यंदा 400 कोटी रूपये
 • स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागासाठी 2533 कोटी, शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी 2 हजार 400 कोटी, जिल्हा परिषद शाळांच्या पुनर्बांधणीसाठी 3 हजार कोटी रुपयांची तरतूद, तर पुण्यातल्या क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रम सुरू करून दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नेहरू सेंटरला 10 कोटी रुपयांचा निधी, तर अमरावती विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला 10 कोटी रुपये, आणि उच्च शिक्षण विभागात 1300कोटी रुपये
 • प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान पार्क उभारलं जाणार त्यासाठी 300 कोटींची तरतूद
 • राज्यात कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यास मंजुर

 

 • 10,226 कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित
 • ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनसाठी 25 कोटीत आणखी 10 कोटींची भर
 • नागपुरात नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 250 कोटींचा खर्च
 • महसूल विभागास 289 कोटी रुपये देणार
 • सामान्य प्रशासन विभागासाठी 1035 कोटींचा निधी
 • जिल्हा नियोजन विभागासाठी 11,035 कोटींचा निधी
 • यंदा 3,47,457 कोटींचा महसूल अपेक्षित होता
 • महसुली उत्पन्नाचे नवे उद्दिष्ट 2,89,494 कोटी

 

Advertisement
 • यंदा 10,226 कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित
 • राजकोषीय तूट 66641 कोटी असेल
 • परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी देणार
 • जेजुरीगडासाठी, सांगलीतले बिरुदेव देवस्थानच्या विकास आराखड्यास निधी देणार
 • अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासालाही पुरेसा निधी उपलब्ध करुन देणार

 

 • नामदेव महाराजांच्या नरसी नामदेवच्या विकासाला पुरेसा निधी देणार
 • बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात स्मारक उभारणार
 • पोहरादेवीच्या विकासाच्या कामास हवा तेवढा निधी देऊ
 • राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला 1500 कोटी रुपये प्रस्तावित
 • बाजार समित्यांच्या बळकटीसाठी 2 हजार कोटींची योजना
 • 4 वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी
 • कृषी पंप जोडणी धोरण राबवणार कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रुपये

 

Advertisement
 • विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी
 • संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार
 • 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार
 • 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार
 • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार
 • 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले

 

 • शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन दिले
 • 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले
 • 3 लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने

 

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement