SpreadIt News | Digital Newspaper

👩 जागतिक महिला दिन : महिलांचा आदर करा, आजचा दिवस महिलांसाठी खास..

0

📙 भारतात महिला फक्त ‘चूल आणि मूल’ इथपर्यंतच मर्यादित होत्या. त्यानंतर सावित्रीबाई फुले, ज्योतीराव फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवून महिलांना सन्मानाची नवीन जागा निर्माण करून पुढे आणले. कोणतेही क्षेत्र असो दैनंदिन काम असो वा कर्तव्यपालन असो यांत महिलांनी आघाडी घेतली आहे.

🎁 महिला दिन साजरा करण्यासाठी ठराविक एका दिवसाची आवश्यकता नाही. कारण, दरदिवशी महिलांचं महत्त्वं हे कायम तितकंच असतं. एक आई म्हणून, बहीण, आजी, मावशी इ. म्हणून हे जग एक उत्तम स्थान बनवण्यासाठी महिलांचं योगदान पाहता त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Advertisement

🙌 प्रत्येकाच्याच आयुष्यात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्त्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुशंगानं या दिवसाचं महत्त्वं खूपच आहे.

👍 पुरुषांप्रमाणे महिलांनाही समाजात समान हक्क मिळावेत, यासाठी झालेल्या संघर्षालाही या दिवशी सलाम करण्यात येतो.

Advertisement

👁‍🗨 काय आहे महिला दिनाचा इतिहास ?

📌 1900 च्या काळापासून जागतिक महिला दिन हा सुरू झाला, असं म्हणता येईल. ज्यावेळी महिलांच्या सामाजिक अस्तित्त्वाच्या लढाईचे वारे नवीन बदलासाठी वाहू लागले होते.

Advertisement

📌 महिलांनी 1908 साली कामाचे कमी तास, चांगलं वेतन आणि मतदानाच्या हक्कांसाठी न्यूयॉर्क शहर गाठलं. काही महिन्यांच्या आंदोलनानंतर पहिला राष्ट्रीय महिला दिवस युनायटेड स्टेट्स येथे 28 फेब्रुवारी या दिवशी पाळला गेला.

🤘 कित्येक राष्ट्रांमध्ये, देशपातळीवर होणाऱ्या महत्वाच्या निर्णयात महिलांचा वाटा आहे. महिलांच्या निर्णय़ांचीही महत्त्वाची भूमिका असून, यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार लागत आहे.

Advertisement

💟 महिला दिनी ठराविक रंगांचं महत्त्व-

जागतिक महिला दिनाच्या दिवशी आज काही महत्त्वाच्या रंगांनाही विशेष प्राधान्य दिलं जातं. यात जांभळा, हिरवा आणि पांढरा अशा रंगांचा समावेश आहे. जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठा अधोरेखित करतो, हिरवा रंग आशेसाठी तर पांढरा रंग शुद्धतेच्या प्रतीकासाठी वापरात आणला जातो.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement